भाजपला धक्का; युपीत सायकल सुसाट,'हात'ही उंचावला

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Sep 16, 2014 05:57 PM IST

भाजपला धक्का; युपीत सायकल सुसाट,'हात'ही उंचावला

bjp sp congress

16 सप्टेंबर : : मोदी सरकारची सत्र परीक्षा समजल्या जाणार्‍या तीन लोकसभा आणि विधानसभेच्या 33 जागेसाठीचा निकाल हाती येत आहे. आतापर्यंतच्या हाती आलेल्या निकालावरुन मोदींची लाट ओसरली असल्याचं दिसून येत आहे. उत्तरप्रदेशमध्ये पुन्हा सायकल 'सुसाट' धावलीये तर काही ठिकाणी काँग्रेसचाही 'हात' उंचावलाय.

9 राज्यांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. गुजरात वगळता भाजपला इतर राज्यांमध्ये जोरदार धक्का बसला आहे.  उत्तर प्रदेशात भाजपला फक्त 2 जागांवर समाधान मानावं लागतंय, तर समाजवादी पक्षाला तब्बल 9 जागांवर यश मिळवलंय. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उत्तर प्रदेशावर विशेष लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे या अपयशामुळे भाजपला मोठाच धक्का बसलाय.

राजस्थानातही भाजपला 4 पैकी फक्त 1 जागा जिंकता आली आहे. तर 3 जागा मिळवत काँग्रेसने गेलेली शान पुन्हा मिळवण्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय. गुजरातमध्ये भाजपला 6 तर काँग्रेसला 3 जागा मिळाल्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपला एका जागेवर यश मिळालंय. या निकालानंतर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या नेत्यांनी भाजपच्या जातीयवादी धोरणावर टीका केलीये.

तर राजस्थानात मिळालेल्या यशामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला. आधी विधानसभा निवडणूक आणि लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अपयशानंतर कार्यकर्ते खचले होते. मात्र, या पोटनिवडणुकांमध्ये मिळालेल्या यशानंतर कार्यकर्ते उत्साहात आले आहेत.

Loading...

बडोद्याची प्रतिष्ठेची लोकसभेची जागा भाजपने जिंकली आहे. भाजपच्या उमेदवाराला 1 लाखापेक्षा जास्त आघाडी मिळाली आहे. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून जोरदार जल्लोष केला.

 चार राज्यांत पोटनिवडणुका

उत्तर प्रदेश

  • समाजवादी पक्ष - 9
  • भाजप - 2

गुजरात

  • भाजप - 6
  • काँग्रेस - 3

राजस्थान

  • काँग्रेस - 3
  • भाजप - 1

प. बंगाल

  • तृणमूल काँग्रेस - 1
  • भाजप - 1

 

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 16, 2014 04:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...