सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास 20 हजार रुपयांचा दंड ?

सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान केल्यास 20 हजार रुपयांचा दंड ?

  • Share this:

2953211975_d90bf2b223

10 सप्टेंबर : तुम्ही जर धुम्रपान करत असाल तर सावधान! आता सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणार्‍यांना तब्बल 20 हजार रूपये मोजावे लागण्याची शक्यता आहे. तसेच सिगारटेच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी असा प्रस्ताव आरोग्य मंत्रालयासमोर सादर करण्यात आला आहे.

तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्री आणि सेवन यासंदर्भात दिल्लीतील माजी सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समितीने गेल्याच आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला हा पर्याय सादर केला आहे. सध्या देशात सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यास 200 रुपयांचा दंड आकारला जातो.तर आता हा दंड तब्बल 20,000 रुपयांवर न्यावे, तसेच सिगारटेच्या सुट्या विक्रीवर बंदी घालण्यात यावी अशी शिफारस समितीने केले आहे. त्याशिवाय तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी वयोमर्यादा 18 ऐवजी 25 वर्षांपर्यंत न्यावी अशी शिफारसही केली आहे.

Follow @ibnlokmattv

First published: September 10, 2014, 6:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading