S M L

तेलंगणाचा अपमान कराल तर गाडून टाकू - के. चंद्रशेखर राव

Samruddha Bhambure | Updated On: Sep 10, 2014 03:59 PM IST

तेलंगणाचा अपमान कराल तर गाडून टाकू - के. चंद्रशेखर राव

10 सप्टेंबर :   तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी मंगळवारी मीडियाला थेट गाडून टाकण्याची धमकी दिली. मीडियावाल्यांनी नवीन तेलंगण राज्याचा अपमान केल्यास त्यांना जमिनीच्या 10 फूट खाली गाडून टाकू असा इशाराच राव यांनी दिला आहे.

तेलंगणामध्ये 16 जूनपासून दोन टीव्ही चॅनल्सचं प्रक्षेपण पूर्णपणे बंद करण्यात आले असून या चॅनल्सनी तेलंगणाविषयी आक्षेपार्ह बातम्या केल्याचा आरोप तेलंगण सरकारने केला आहे. या कारवाईचे समर्थन करताना चंद्रशेखर यांनी मीडियावर जोरदार टीका केली. 'तेलंगण विरोधात बातम्या दाखवणार्‍या दोन चॅनल्सचे प्रक्षेपण बंद करणार्‍या राज्यातल्या केबल चालकांचे मी आभार मानतो. जर हे चॅनल्सचं सुधारले नाहीत तर त्यांना मी धडा शिकवीन असे विधान चंद्रशेखर राव यांनी केले. जर या मीडियावाल्यांनी अशाच पद्धतीनं तेलंगणाचा अपमान केला त्यांना जमिनीच्या 10 फूट खाली गाडून टाकू असंही ते म्हणाले. दरम्यान. विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेवर कठोर टीका केली आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 10, 2014 03:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close