05 सप्टेंबर : 'कर्म करो फल की इच्छा मत करो' असं म्हटलं जात पण आता पाकिस्तानने आपल्या 'कर्मा'वर पांघरून घालण्यासाठी मैत्रीचा हात आणखी पुढे केलाय असं दिसून येतंय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चक्क आंबे पाठवले आहे.
जपानहून परत येताच पंतप्रधान मोदींना एक अनोखं गिफ्ट मिळालंय. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी मोदींना आंबे भेट म्हणून पाठवले आहेत. मोदींबरोबरच राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनाही त्यांनी आंबे पाठवले आहेत. याच महिन्यात न्यू यॉर्कमध्ये मोदी आणि शरीफ यांची भेट होऊ शकते. यासाठी वातावरण अनुकूल करण्याचा शरीफ यांचा प्रयत्न आहे. गेल्या महिन्याभरात
सीमारेषेवर वारंवार पाककडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झालंय एवढंच नाहीतर पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांनी फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सच्या नेत्यांची भेट घेतल्यामुळे दोन देशांमध्ये तणाव निर्माण झाला होता. यावर मोदींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे आपल्या कर्मावर पांघरून घालण्यासाठी पाकला 'फल'ची चिंता लागलीये.
Follow @ibnlokmattv |