सर्व्हे : मोदी सरकारच्या कामावर जनता खूश

सर्व्हे : मोदी सरकारच्या कामावर जनता खूश

 • Share this:

27may_pm_modioffice03 सप्टेंबर : 'आपण मजदूर नंबर 1 असून आपलं संपूर्ण आयुष्य जनतेच्या सेवेसाठी अर्पण करत असल्यांचं म्हणत नरेंद्र मोदींनी देशाच्या जनतेला जणू वचनच दिलं. आता मोदी सरकाराला सत्तेवर विराजमान होऊन 100 दिवस पूर्ण झाले आहेत. पण मोदींनी आपण दिलेला शब्द पाळत जनतेच्या विश्वासावर खरी उतरली आहे.

गेल्या 100 दिवसांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे दिलेलं आश्वासन खरोखरच पाळलंय का ? त्यांच्या या कार्यपद्धतीबद्दल लोकांना काय वाटतं. याबद्दल टुडेज चाणक्य आणि आयबीएन-नेटवर्कनं शंभर सर्व्हे केलाय.

त्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर बहुतांशी लोकांना मोदी सरकारच्या कामगिरीचं कौैतुक केलंय. गेल्या 100 दिवसांत नरेंद्र मोदी आणखी काय चांगलं करू शकलं असतं, यावरही लोकांनी प्रतिक्रिया दिल्यात. मोदींच परराष्ट्र धोरण, आर्थिक धोरण, लोकांशी संवाद, भ्रष्टाचाराचा मुद्दा यासह अनेक प्रश्नांवर लोकांच्या समाधान व्यक्त केलंय.

मोदी सरकारच्या कामावर 66 टक्के लोक समाधानी

तब्बल दहा वर्ष भारतीय जनतेनं यूपीए सरकारला सेवा करण्याची संधी दिली पण दहा वर्षात भ्रष्टाचार, महागाई, घोटाळ्यांमुळे मलीन झालेल्या यूपीए सरकारला जनतेनं अखेरीस घरचा रस्ता दाखवला. नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारापासून जनतेला विकासाचं भव्य स्वप्न दाखवलं. जनतेनंही मोदींच्या विकासाच्या मॉडेलला पसंती देत सत्तेच्या चाव्या हाती दिल्या. आज मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले त्यानिमित्ताने आम्ही मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का ? अशा थेट सवाल विचारला असता तब्बल 66 टक्के लोकांनी होकार दिलाय तर 19 टक्के लोकांनी नकार दिलाय. तर 8 टक्के लोकांनी माहिती नाही तर 7 टक्के लोकांनी सांगू

शक्त नाही असं उत्तर दिलंय. त्यानंतर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे शंभर दिवस पूर्ण करतायत. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल ? असा सवाल विचारला असता 41 टक्के लोकांनी मोदींच्या कामाचं मूल्यमापन हे परिणामकारक, वेगवान आणि उद्दिष्टपूर्ण

असल्याचं सांगितलं. तर 10 टक्के लोकांनी साधारण असल्याचा शेरा दिलाय. एकंदरीतच जनतेचा कौल पाहता मोदी सरकारच्या कामगिरीवर जनता खूश आहे.

भ्रष्टाचाराला आळा बसणार ?

देशात एकीकडे विकासाचे वारे वाहत आहे तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचा भस्मासूर आणखी आ वासत आहे. गेल्या दहा वर्षात 2 जी घोटाळा, कोळसा घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांनी जनता हैराण झाली. या घोटाळ्यांमुळे यूपीए सरकारला तर घरी जावं लागलं पण देशात इतके भ्रष्टाचाराचे प्रकरण पाहून सर्वसामान्यही हादरून गेले. लोकसभेच्या प्रचारात मोदींनीही भ्रष्टाचार हटवण्यावर जोर दिला. काळा पैसा परत आणणार, भ्रष्टाचार संपवणार अशी आश्वासनं दिली. त्यामुळे मोदी सरकार भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल असं तुम्हाला वाटतं का ? असा सवाल विचारला असता 54 टक्के लोकांनी होकार दर्शवला आहे. तर 24 टक्के लोकांनी नकार दिला आहे. तर 13 टक्के लोकांनी माहीत नाही असं उत्तर दिलंय.

भारतीय अर्थव्यवस्थेला 'मोदी टच'

एकीकडे वाढती महागाई आणि आंतराष्ट्रीय बाजारात रुपयाची घसरण यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा गाडा डबघाईच्या चिखलात रुतलाय. त्यात भरातभर म्हणजे अस्मानी संकटांमुळे शेतकरी हवालदील झाले त्यामुळे उत्पादनला फटका बसला, राज्याअंतर्गत करप्रणाली यामुळे उद्योगधंदे एकतर स्थालांतरीत किंवा बंद पडत आहे आणि दुसरीकडे आंतराष्ट्रीय बाजारात डॉलर विरुद्ध रुपयाचा जंगी सामनाही रंगलाय. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेवर डबघाईची टांगती तलवार कायम आहे. मोदी सरकार पुढे सर्वात मोठं आव्हान हे अर्थव्यवस्था सुधारण्याचं अजूनही आहे. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आलीय का ? असा सवाल विचारला असता 41 टक्के लोकांनी होकार दर्शवला आहे तर 34 टक्के लोकांनी नाही म्हटलंय. तर 14 टक्के लोकांनी माहीत नाही असं उत्तर दिलंय.

'मोदी लाट कायम'

'अब की बार मोदी सरकार' अशी गर्जना करुन नरेंद्र मोदी यांनी भाजपला सत्तेत आणून दाखवलं. मोदींच्या करिष्म्यामुळे भाजपला सत्तेवर विराजमान होता आलं. पण जे इतर सत्ताधार्‍यांचं झालं तेच मोदींबाबत झालं का ? अशी कुजबूज सुरू झाली. मोदींची लाट ओसरली अशी टीका विरोधकांनी केली. मात्र मोदींची लाट अजूनही कायम असल्याचं दिसून येतंय. पाच राज्यात विधानसभेच्या निवडणूक होणार आहे त्यामुळे आता निवडणुका झाल्या तर मोदी सरकार अधिक जागा मिळवू शकेल का ? असा प्रश्न विचारला असता 51 टक्के लोकांनी होकार दिलाय. तर 26 टक्के लोकांनी नकार दिला आहे. तर 12 टक्के लोकांनी सांगू शकत नाही असं उत्तर दिलंय. त्यामुळे मोदी लाट अजून तरी ओसरली नाही हेच जनतेच्या कौलवरुन स्पष्ट होतंय.

मोदी सरकारच्या कार्यपद्धतीबद्दल

1. मोदी सरकारच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का?

 • - हो - 66%
 • - नाही - 19%
 • - माहीत नाही - 8%
 • - सांगू शकत नाही - 7%

2. मोदी सरकार भ्रष्टाचाराला आळा घालू शकेल असं तुम्हाला वाटतं का?

 • - हो - 54%
 • - नाही - 24%
 • - माहीत नाही - 13%
 • - सांगू शकत नाही - 9%

3. भारतीय अर्थव्यवस्था रुळावर आलीय का?

 • - हो - 41%
 • - नाही - 34%
 • - माहीत नाही - 14%
 • - सांगू शकत नाही - 11%

4. नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाचे शंभर दिवस पूर्ण करतायत. त्यांच्या आतापर्यंतच्या कामगिरीचं मूल्यमापन कसं कराल?

 • - परिणामकारक, वेगवान, उद्दिष्टपूर्ण - 41%
 • - साधारण - 10%
 • - धीमी आणि सातत्याचा अभाव - 8%
 • - पुरेसी धाडसी आणि कठोर नाही - 35%
 • - माहीत नाही - 6%

5. या 100 दिवसांत पंतप्रधान मोदी कोणतं काम अधिक चांगलं करू शकले असते असं तुम्हाला वाटतं?

 • - भ्रष्टाचाराविरोधात अधिक ठोस भूमिका - 13%
 • - वाढत्या महागाईविरोधात कठोर पाऊल - 48%
 • - जातीय हिंसाचाराविरोधात ठोस भूमिका - 11%
 • - वरीलपैकी काहीही नाही - 20%
 • - माहीत नाही - 8%

6. नरेंद्र मोदींच्या कार्यपद्धतीचं वर्णन तुम्ही कसं कराल?

 • - चाकोरीबाहेर विचार - 11%
 • - सरकारवर पूर्ण पकड - 18%
 • - सर्व मुद्द्यांवर नियंत्रण - 39%
 • - एकाधिकारशाही - 25%
 • - माहीत नाही - 7%

7. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकांशी संवाद कसा साधतात?

 • - परिणामकारक - 50%
 • - खूपच वाईट - 8%
 • - आताच सांगणं घाईचं - 29%
 • - माहीत नाही - 13%

8. आता निवडणुका झाल्या तर मोदी सरकार अधिक जागा मिळवू शकेल का?

 • - हो - 51%
 • - नाही - 26%
 • - माहीत नाही - 11%
 • - सांगू शकत नाही - 12%

मोदी सरकारचे 100 दिवस महत्त्वाचे निर्णय

 1. - नियोजन आयोग बरखास्त आणि राष्ट्रीय सल्लागार परिषदेचे अधिकार कमी
 2. - कालबाह्य कायदे किंवा तरतुदी शोधण्यासाठी व त्या काढून टाकण्यासाठी विशेष मंडळ
 3. - पंतप्रधान जन-धन योजनेद्वारे पहिल्याच दिवशी दीड कोटी बँक खाती सुरू
 4. - काळ्या पैशाच्या चौकशीसाठी विशेष पथकाची स्थापना
 5. - गंगा शुद्धीकरणासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना आणि त्यासाठी विशेष निधीची तरतूद
 6. - पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांसाठी एक खिडकी योजना
 7. - सरदार सरोवराची उंची 17 मीटरने वाढवण्यास परवानगी
 8. - रेल्वे, संरक्षण आणि विमा क्षेत्रात परकीय गुंतवणुकीस चालना
 9. - देशातल्या 12 बंदरांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्याचा आराखडा
 10. - केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयातर्फे इनोव्हेशन बँकेची स्थापना करण्याची घोषणा
 11. - लोकांच्या नव्या कल्पना थेट पंतप्रधानांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'मायगव्ह' या संकेतस्थळाची स्थापना

हे पण वाचा 

मोदी सरकारचं 100 दिवसांचं रिपोर्ट कार्ड !

 

Follow @ibnlokmattv

First published: September 3, 2014, 11:44 PM IST

ताज्या बातम्या