15 व्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालं घवघवीत यश

16 मे 15 व्या लोकसभेच्या निवडणुकीत युपीएनं एनडीए आणि डाव्यांना नेस्तनाबूत करत घवघवीत यश मिळवलं आहे. काँग्रेसच्या या विजयाने तो मोठा पक्ष असल्याचं उदयाला आलं आहे. युपीएला मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल अभिनंदन करण्यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची त्यांची घरी भेट घेतली. विजयाचं श्रेय सोनिया गांधी यांचं नेतृत्व आणि राहुल गांधींच्या अथक परिश्रमालाच जातंय, असं पंतप्रधान म्हणाले. युपीए सरकारवर विश्वास व्यक्त केल्याबद्दल त्यांनी लोकांचेही आभार मानले. तर, 15 व्या लोकसभेत मनमोहन सिंगच पंतप्रधान असतील, असं सोनियांनी जाहीर केलं. राहुल यांना मंत्रिमंडळात घ्यायचं की नाही, याचा निर्णय मनमोहन यांनीच घ्यावा, असंही त्यांनी सांगितलं. युपीएला मिळालेल्या जागा - 256काँग्रेस - 200 डीएमके - 18नॅशनल कॉन्फरन्स (एनसी) - 3तृणमूल काँग्रेस (टीसी)- 19एनसीपी - 9झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) - 2इतर - 2काँग्रेसला मिळालेल्या जागा गुजरात - 18पश्चिम बंगाल - 6बिहार - 2महाराष्ट्र - 17राजस्थान - 20आंध्रप्रदेश - 32आसाम - 7ओरिसा - 3हरियाणा - 9पंजाब - 8मणिपूर - 2कर्नाटक - 6केरळ - 13

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 16, 2009 04:58 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 16, 2009 04:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...