S M L

खा. योगी आदित्यनाथ यांची मुक्ताफळं

Samruddha Bhambure | Updated On: Aug 31, 2014 03:26 PM IST

खा. योगी आदित्यनाथ यांची मुक्ताफळं

31 ऑगस्ट : मुस्लिमांच्या भागात जास्त दंगली घडत असून 40 टक्क्यांपेक्षा जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेल्या भागांमध्ये अन्य धर्मियांना स्थान दिले जात नाही असं वादग्रस्त विधान भाजपचे गोरखपूरमधील खासदार योगी आदित्यनाथ यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर काँग्रेस आणि समाजवादी पक्षाने जोरदार टीका केली आहे.

विधानसभा पोटनिवडणुकांसाठी स्टार प्रचारकांपैकी एक असलेले भाजपचे गोरखपूरचे खासदार योगी आदित्यनाथ यांनी रविवारी जातीय दंगलीविषयी वादग्रस्त विधान केलं आहे. ज्या ठिकाणी मुस्लिमांची संख्या जास्त असते, तिथं हिंदूंचे हाल होतात असा आरोप त्यांनी केला आहे. ज्या ठिकाणी 35 ते 40 टक्के मुस्लीम समाजातले लोक राहतात तिथे इतर समाजातल्या लोकांना राहायला जागा मिळत नाही, असंही त्यांनी म्हटलंय. त्यांच्या या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. या विधानामुळे विरोधक भाजपवर टीका करत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे लाल किल्ल्यावरील विधान आणि आदित्यनाथ यांचे विधान परस्परविरोधी असल्याचा टोला काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी लगावला आहे.


Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 31, 2014 03:26 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close