Elec-widget

दहशतवाद्यांशी चकमकीत आणखी एक जवान शहीद

दहशतवाद्यांशी चकमकीत आणखी एक जवान शहीद

  • Share this:

kupvada30 ऑगस्ट : जम्मू काश्मीरमधल्या कुपवाड्यामध्ये आज पुन्हा भारतीय सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सीमारेषेजवळच्या कलरूस भागात झालेल्या या चकमकीत एक जवान शहीद झाला तर दोन जण जखमी झाले आहे.

10 दिवसांपूर्वी घुसखोरी केलेल्या 5 दहशतवाद्यांसोबत ही चकमक झाली. दहशतवाद्यांकडून यावेळी मोठ्याप्रमाणावर शस्त्र जप्त करण्यात आली. कुपवाडाच्या जंगलात गेल्या सात दिवसांपासून लष्कराचं कोम्बिंग ऑपरेशन सुरू आहे.

यादरम्यान, लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. मागील सात दिवसांत चकमकीत सहा दहशतवादी ठार झाले तर लष्कराचे 4 जवान शहीद झाले आहे. आजही सैन्यात आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. सैन्याने संपर्ण परिसराला घेराव घातला असून फायरिंग सुरू आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 01:05 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...