पंतप्रधान मोदी जपान दौर्‍यावर

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 30, 2014 01:25 PM IST

Modi Blog30 ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी 5 दिवसांच्या जपान दौर्‍यावर रवाना झाले आहे. एअर इंडियाच्या विशेष विमानाने मोदी जपानला रवाना झाले आहे. क्योटोमध्ये जपानचे पंतप्रधान शिंझो ऍबे नरेंद्र मोदींचं स्वागत करतील. भारत आणि जपानचे द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी ही जपानभेट आहे. सरकार स्थापन केल्यापासून मोदी यांची हा सगळ्यांत मोठा द्विपक्षीय दौरा असणार आहे. शुक्रवारी मोदींनी जपानी भाषेत ट्विट केल्यानंतर आता शिन्झो आबे यांनीही ट्विट केलं. आपण मोदींच्या या दौर्‍याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत, असंह ऍबे यांनी म्हटलं आहे. या दौर्‍यात दोन्ही देशांदरम्यान अणुकरारावर सह्या होण्याची अपेक्षा आहे. भारतीय उपखंडाच्या बाहेर हा मोदींचा पहिला दौरा आहे. आपल्या जपानच्या दौर्‍यात मोदी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2014 08:06 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...