Elec-widget

पाकने द्विपक्षीय चर्चेचा तमाशा केला, मोदींनी खडसावले

  • Share this:

ind vs pak29 ऑगस्ट : भारत आणि पाकिस्तानच्या द्विपक्षीय चर्चेच्या आधी पाकिस्तानने काश्मीरमधल्या फुटीरवादी नेत्यांशी चर्चा करणं पसंत केलं आणि द्विपक्षीय चर्चेचा अक्षरशः तमाशा केला, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाकिस्तानवर टीका केलीये.

मोदी उद्या (शनिवारी)जपानच्या दौर्‍यावर रवाना होणा आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांनी जपानी मीडियाशी संवाद साधला, त्यावेळी त्यांनी पाकिस्तावर टीका केली. मात्र, पाकिस्तानशी मैत्रीपूर्ण आणि शांततेचे संबंध राखण्यासाठी भारताचा कायम प्रयत्न असेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मोदी म्हणतात, "भारताला पाकिस्तानशी शांततेचे, मैत्रीचे आणि सहकार्याचे संबंध ठेवण्याची इच्छा आहे. पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याबरोबर माझी मे 2014 मध्ये खूप चांगली बैठक झाली होती. परराष्ट्र सचिवांनी भेटून संबंध पुढे न्यावेत याबद्दल आम्ही निर्णय घेतला. सिमला करार आणि लाहोर करार यांच्या द्विपक्षीय चौकटीत बसणार्‍या कोणत्याही मुद्द्यावर पाकिस्तानशी चर्चा करायला आम्ही तयार आहोत." विशेष म्हणजे एकीकडे पाक मैत्रीपूर्ण संबंध दाखवत आहे तर दुसरीकडे सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. त्यामुळे मोदी सरकारने यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

अखेर ध्वज बैठक पार पडली

दरम्यान, आज भारत आणि पाकिस्तानच्या सेक्टर कमांडर दर्जाच्या अधिकार्‍यांदरम्यान फ्लॅग मिटिंग झाली. सुमारे साडेतीन तास ही मिटिंग झाली. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्ताननं सातत्यानं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. त्या पार्श्वभूमीवर ही मिटिंग झाली. या बैठकीत भारताच्या वतीने सर्व महत्त्वाचे मुद्दे उपस्थित करण्यात आले, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांनी दिली.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 29, 2014 09:14 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...