रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांच्या मुलाविरोधात बलात्काराचा गुन्हा

  • Share this:

kartik Gauda

28 ऑगस्ट : केंद्रीय रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक गौडा यांच्याविरोधात एका मॉडेलने लग्नाचे आमीष दाखवून लैंगिक शोषण केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी तिने कार्तिक गौडा यांच्याविरोधात लैंगिक शोषण आणि फसवणुकीची तक्रार दाखल केली आहे.

गौडा यांचा मुलगा कार्तिक, याच्या साखरपुड्याची घोषणा नुकतीच झाली. पण त्याचं आधीच माझ्याबरोबर अनौपचारिकपणे लग्न झालंय, असा दावा या पीडित महिलेने केला आहे. कार्तिक गौडानं माझ्या इच्छेविरुद्ध माझ्याशी शारिरीक संबंध ठेवले, असा आरोपही तिने केला आहे. पोलिसांनी कार्तिक गौडा यांच्याविरोधात बलात्कार (कलम 376), विश्वासघात आणि फसवणूक (कलम 420) या कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, कार्तिक यांच्या आईने मात्र हे आरोप फेटाळले आहेत तर रेल्वेमंत्री गौडा यांनी मी या प्रकरणाची माहिती घेतोय. मला सत्य कळल्यानंतर मी तुम्हाला सांगेन असं म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 28, 2014 11:38 AM IST

ताज्या बातम्या