दहशतवाद्यांशी चकमकीत भारतीय जवान शहीद

  • Share this:

loc25 ऑगस्ट : सीमारेषेवर पाकिस्तानी सैन्याकडून एकीकडे कुरापत्या सुरूच आहे. त्याचा फायदा दहशदवादी घेत आहे. गेल्या आठवड्याभरापासून पाककडून शस्त्रसंधीला केराची टोपली दाखवून गोळीबार सुरूच आहे. कुपवाडामध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एक भारतीय जवान शहीद झाला आहे. लान्स नाईक धनंजय कुमार यांना वीरमरण आलंय.

सीमारेषेवर घुसखोरांना मदत करण्यासाठी पाककडून गोळीबारीचा बनाव केला जातो याचा फायदा घेत दहशतवादी घुसखोरी करत असल्याचं निदर्शनं आलंय.

दरम्यान, गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी आज (सोमवारी) जम्मू आणि काश्मीरमधल्या घडामोडींची चर्चा करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तान सातत्यानं जम्मू आणि काश्मीरमध्ये शस्त्रसंधीचं उल्लंघन करत आहे.

रविवारी रात्रीपासून पाकिस्ताननं सांबा आणि अखनूरमध्ये बीएसएफच्या 35 चौक्यांवर गोळीबार केला आहे. या गोळीबार दोन स्थानिक नागरिकांचा मृत्यू झालाय.

मागील आठवड्यात जम्मू काश्मीरच्या अखनूर सेक्टरमध्ये चकला गावात 60 मीटर लांब सुरूंग सापडली. ही सुरूंग मुनव्वर नदीजवळच्या गावात मिळाली. ही सुरूंग पाक सैनिकांनी दहशतवाद्यांनी घुसखोरी करण्यासाठी बनवली असावी असा संशय आहे. भारतीय सैनिकांनी याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी चौकशी सुरू केलीये. पाककडून होत असलेल्या गोळीबारामुळे सीमारेषेवर असलेल्या गावातील ग्रामस्थांनी घर सोडून शहराकडे धाव घेत आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 25, 2014 11:29 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...