मनमोहन सिंग आपल्या जबाबदारीपासून पळत होते- विनोद राय

मनमोहन सिंग आपल्या जबाबदारीपासून पळत होते- विनोद राय

  • Share this:

Vinod ray 1

24 ऑगस्ट :  माजी पंतप्रधान मनमोहन सिंग पुन्हा एकदा टिकेचे लक्ष्य ठरले आहेत. माजी कॅग विनोद राय यांच्या 'नॉट जस्ट ऍन अकाऊंट' या पुस्तकात मनमोहन सिंगांवर त्यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जबाबदारीतून पळ काढला, असा आरोप विनोद राय यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

याआधी पंतप्रधान कार्यालयाचे माजी प्रसिद्धी सल्लागार संजय बारू यांच्या 'द ऍक्सीडेंटल प्राइम मिनिस्टर' आणि माजी कोळसा सचिव पी.सी.परख यांच्या 'क्रुसेडर ऑर कॉन्स्पिरेटर - कोलगेट ऍण्ड अदर टज्थ्स' या पुस्तकातही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर अशीचं टीका करण्यात आली होती. राय यांनी पुस्तकाच्या प्रकाशना आधी या पुस्तकाबद्दलची काही माहिती प्रसिद्ध केली आहे.

'काही नेते माझ्या घरी आले होते व त्यांनी राष्ट्रकूल आणि कोळसा घोटाळ्याप्रकरणी कॅगने दिलेल्या अहवालातून काही व्यक्तींची नावे हटवा किंवा त्यांना वाचवा' असे मला सांगितल्याचा दावा रॉय यांनी केला. माजी पंतप्रधानांनी त्यांच्या काळामध्ये झालेल्या घोटाळ्यांची जबाबदारी स्विकारली नाही, अशी टीकाही या पुस्तकात करण्यात आली आहे. केवळ सत्तेत राहण्यासाठी प्रत्येक बाबतीत तडजोड करणं योग्य नव्हे, असंही त्यांनी या पुस्तकात म्हटलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 24, 2014, 4:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading