भाजप नेत्याची शेलक्या शब्दात टीका; काँग्रेस नेत्यांचा झाला तिळपापड

भाजप नेत्याची शेलक्या शब्दात टीका; काँग्रेस नेत्यांचा झाला तिळपापड

विधानसभा 2019: प्रचारसभेदरम्यान मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेसवर शेलक्या शब्दात टीका.

  • Share this:

सोनीपत, 14 ऑक्टोबर: महाराष्ट्र राज्याप्रमाणेच हरियाणातही विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर हरियाणातील राजकारण तापलं असून एकमेकांविरोधात शेलक्या शब्दात टीक करणं सुरू आहे. हरियाणात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोरदार सुरू आहे. रविवारी याच प्रचारादरम्यान हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर सोनीपत इथे सभा घेत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल यांनी यावेळी शेलक्या शब्दात टीका केली. ही टीका काँग्रेस नेत्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.

'2019 च्य लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाल्यानंतर राहुल गांधींनी काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर कित्येक दिवस राहुल गांधींची मनधरणी करण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या वरिष्ठांनी करूनही राहुल गांधी त्यांच्या निर्णयावर ठाम होते. दरम्यान तीन महिने देशभऱात काँग्रेस अध्यक्षपदासाठी उमेदवार शोधण्याचा घाट काँग्रेसनं आटोपता घेत पुन्हा एकदा घराणेशाही दाखवत सोनिया गांधीकडे अध्यक्षपद सोपवलं. काँग्रेसने घराणेशाही सोडली नाही आणि तीन महिन्यानंतर पुन्हा एकदा सोनिया गांधीकडे अध्यक्षपद सोपवलं. थोडक्यात काय तर 'खोदा पहाड़ और निकली मरी हुई चुहिया'', असं म्हणत शेलक्या शब्दात टीका केली आहे.

सोनीपत मतदारसंघातून भाजप उमेदवार मीना अग्रवाल यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर जनतेला संबोधित करण्यासाठी रविवारी उपस्थित होते. यावेळी 'घराणेशाहीपासून दूर रहायला हवं. काँग्रेसमध्येही दोन गट पडले आहेत. एक आई आणि दुसरा पप्पू. लोकसभा निवडणूक हरल्यानंतर राहुल गांधींनी आपल्या काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. राजकारणातील घराणेशाही संपुष्टात यायला हवी असं राहुल गांधींना त्यावेळी वाटू लागलं होतं. मात्र सोनिया गांधी घराणेशाहीबाबत ठाम होत्या. काँग्रेस अध्यक्षपदासाठी संपूर्ण देश पिंजून काढला मात्र शेवटी घराणेशाहीचा वापर करून पुन्हा एकदा सोनिया गांधीकडे काँग्रेस अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली. असं म्हणत काँग्रेसवर हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री खट्टर यांनी दुष्यंत चौटाला कुटुंबियांवरही निशाणा साधला आहे. 'वडील तुरुंगाची हवा खात आहेत आणि मुलगा मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पाहात आहे'. चौटाला कुटुंबियांपासून लांब रहण्याचा सल्लाही कट्टर यांनी दिला आहे. हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल कट्टर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे हरियाणा प्रचारातील वातावरण चांगलंच तापलं आहे. खट्टर यांची टीका काँग्रेसच्या जिव्हारी लागली असून काँग्रेसचे नेते याला कसं प्रत्युत्तर देतात हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात भाजपची पुन्हा सरशी होणार का याकडेही सर्वाचं लक्ष लागलं आहे.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

SPECIAL REPORT: दोन राजकीय पैलवानांची कथा, शरद पवार मुख्यमंत्र्यांना चितपट करणार?

Published by: Kranti Kanetkar
First published: October 14, 2019, 9:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading