लोकसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा द्रमुकचे एम.तंबीदुराई

लोकसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा द्रमुकचे एम.तंबीदुराई

  • Share this:

tambai

13  ऑगस्ट : लोकसभेच्या उपाध्यक्षपदी आज अण्णा द्रमुकचे एम.तंबीदुराई यांची नियुक्ती झाली. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचे तंबीदुराई हे या पदाचे प्रमुख दावेदार होते. परंपरेनुसार उपाध्यक्षपद हे विरोधी पक्षाला दिलं जातं. एनडीए उपाध्यक्षपदासाठी अण्णा द्रमुकला पाठिंबा दिल्यानंतर काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी त्यांच्या नियुक्तीला विरोध केला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तंबीदुराईंचं अभिनंदन करत लोकसभेत छोटेखानी भाषण केलं. या नियुक्तीद्वारे भाजपने काँग्रेसला पुन्हा एकदा एकटं पाडलं आहे. काँग्रेसवर नामुष्कीची ही दुसरी वेळ आहे. विरोधी पक्षनेता पदानंतर आता हे पदही काँग्रेसच्या हातातून गेलं आहे.

Follow @ibnlokmattv

First published: August 13, 2014, 11:24 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading