लोकसभेचं उपाध्यक्षपद अण्णा द्रमुकला मिळण्याची शक्यता

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Aug 12, 2014 02:51 PM IST

12 ऑगस्ट :  Image img_236592_loksabha4_240x180.jpgमोदींची सत्ता आल्यानंतर आता लोकसभेचं उपाध्यक्षपदही काँग्रेसच्या हातून जाणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या अण्णा द्रमुकचे तंबी दुराई हे या पदाचे प्रमुख दावेदार आहेत.

एनडीए उपाध्यक्ष पदासाठी अण्णा द्रमुकला पाठिंबा देणार आहे. परंपरेनुसार उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिलं जातं. पण काँग्रेसकडे संख्याबळ नसल्यानं हे पद काँग्रेसला मिळणार नाही हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे काँग्रेससाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जात आहे.

केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री व्यंकय्या नायडू यांनी काँग्रेस आणि इतर पक्षांच्या खासदारांनाही तंबी दुराई यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन केले आहे.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 12, 2014 02:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...