पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह आणि कारगिलच्या दौर्‍यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह आणि कारगिलच्या दौर्‍यावर

  • Share this:

Modi in Leh

12  ऑगस्ट :  पंतप्रधान नरेंद्र मोदी आज लेह-लडाखच्या दौर्‍यावर आहेत. शांततेच्या काळात कारगिलला भेट देणारे मोदी पहिलेच पंतप्रधान आहेत.  या राज्याचा 40 दिवसांत त्यांचा हा दुसरा दौरा आहे. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौर्‍याआधी सोमवारी दहशतवाद्यांनी पंपोर जिल्ह्यात बीएसएफच्या ताफ्यावर हल्ला केला. यात सात जवान जखमी झाले आहेत.

मोदी आज लेहमध्ये सैनिकांशी संवाद साधून, निमू बाजगो या जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करणार आहे. त्यानंतर ते लेहमध्ये सभाही घेणार आहेत. ही सभा झाल्यावर ते कारगिलकडे प्रयाण करतील. तिथे ते 44 मेगावॉटच्या चुटक जलविद्युत प्रकल्पाचं उद्घाटन करून सभा घेणार आहेत. दोन्ही सभांच्या ठिकाणी कडक सुरक्षा ठेवण्यात आली. भाजप नेते मुख्तार अब्बास नक्वी स्वत: कालपासून कारगिलमध्ये होणार्‍या सभेच्या तयारींवर लक्ष ठेवून आहेत.

कारगिलमध्ये बहुतांश नागरिक हे मुस्लीम आहेत. त्या अर्थाने मुस्लीम प्रेक्षकांसमोर मोदींची ही पहिलीच सभा असणार आहे. मोदी सियाचेनलाही जाण्याची शक्यता आहे पण याबाबत सरकारकडून कोणतीही पुष्टी केलेली नाही.

मोदींच्या दौर्‍या आधी दहशतवादी हल्ला

मोदींच्या आजच्या दौर्‍यापूर्वी काल सोमवारी मध्यरात्री श्रीनगर शहराजवळच्या पंपोर जिल्ह्यात सीमा सुरक्षा दलाच्या (बीएसएफ) ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 7 जवान जखमी झाले असून, त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बीएसएफच्या अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, बीएसएफच्या 151 बटालियनच्या जवान श्रीनगरमधल्या कँपकडे जात असताना दहशतवाद्यांनी हा हल्ला केला.

Follow @ibnlokmattv

First published: August 12, 2014, 10:11 AM IST

ताज्या बातम्या