मी सक्रिय राजकारणात उतरणार नाही -प्रियांका गांधी

मी सक्रिय राजकारणात उतरणार नाही -प्रियांका गांधी

  • Share this:

priyanka

09  ऑगस्ट : प्रियंका गांधी लवकरच सक्रिय राजकारणात उतरणार असल्याच्या चर्चेंना आता पूर्णविराम मिळाला आहे. आपण सक्रिय राजकारणात येत असल्याच्या वृत्ताचं स्वत: प्रियांका गांधींनी खंडन केलं आहे. माझ्याबाबत सक्रिय राजकारणात येणार्‍या बातम्या निराधार असल्याचेही -प्रियांकांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रियांका गांधी लवकरच सक्रिय राजकारणात उतरणार असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा रंगली होती. पण या बातम्या निराधार असल्याचं सांगत त्या म्हणाल्या की मी सक्रिय राजकारणात उतरणार नाही आणि काँग्रेसमध्ये कोणतंही पद घेणार नाही. काही माणसे स्वत:च्या फायद्यासाठी अशा बातम्या पसरवतात असंही त्या पुढे म्हणाल्या.

Follow @ibnlokmattv

First published: August 9, 2014, 12:17 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading