चौथ्या टप्प्यात 8 राज्यांमध्ये सरासरी 57 टक्के मतदान

7 मे लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात आज गुरूवारी 8 राज्यांत सरासरी 57 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. मतदानाची ही टक्केवारी मागच्या तीन टप्प्यांपेक्षा चांगली असल्याचं निवडणूक उपायुक्त आर. बालकृष्णन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. या मतदानामुळे अनेक दिग्गजांचं भवितव्य पणाला लागणार आहे. पश्चिम बंगालमधल्या हिंसाचारग्रस्त नंदिग्राममध्ये मतदानाचा उच्चांक गाठला आहे. इथे 88 टक्के मतदानाची नोंद झालीय. मतदानादरम्यान पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराचं गालबोट लागलं आहे.नंदिग्राममधल्या गारुपुरा आणि अधिकारी-पाडा गावात झालेल्या गोळीबारात 3 जण जखमी झाले आहेत. या भागात अज्ञात व्यक्तिंनी मतदान केंद्र ताब्यात घेण्याचा प्रयत्न केल्याचं समजतंय. मतदान केंद्रावर क्रूड बॉम्बसुद्धा फेकण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी तीन लोकांना अटक केलीय. आसनसोलमध्ये तृणमूल काँग्रेस आणि सीपाएमच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष झाला. त्यात एक जण ठार झालाय. तर मुख्य निवडणूक आयुक्त नवीन चावला यांचं नावच मतदार यादीत नव्हतं. नवीन जिंदाल यांच्याच कुरुक्षेत्र मतदारसंघात संपूर्ण खानपूर गावाने मतदानावर बहिष्कार टाकल्याचं समजतंय. आज 7 मे ला पार पडलेल्या चौथ्या टप्प्यात अनेक व्हीआयपींनी वेगवेगळ्या ठिकाणी मतदान केलं. राजधानी दिल्लीत सरासरी 50 टक्के मतदान झालंय. महानर मुंबईपेक्षा दिल्लीतल्या मतदानाची टक्केवारी जास्त आहे. पण समाधानकारक नाहीय. नवी दिल्लीतही अनेक मान्यवरांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यात काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल, विद्यापीठ अनुदान आयोगाचे म्हणजे युजीसीचे अध्यक्ष सुखदेव थोरात यांचा समावेश होता. राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनीही दिल्लीत आज मतदान केलं. उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांच्यासारख्या दिग्गजांनी मतदानाचा हक्क बजावला. प्रियंका गांधी यांनी पती रॉबर्ट वडेरा यांच्यासोबत मतदान केलं. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्यानंतर राहुल गांधी यांनीही दिल्लीतून मतदान केलं. याशिवाय बिहारमध्ये पाटलीपुत्र इथून लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या पत्नी राबडीदेवी यांनी मतदान केलं. सचिन पायलट यांनीही अजमेरमध्ये मतदान केलं. चौथ्या टप्प्यात 8 राज्यांमधला मतदानाचा निकाल :दिल्ली - 50 टक्केराजस्थान -50 टक्के पश्चिम बंगाल -75 टक्के उत्तर प्रदेश -50 टक्के बिहार - 37 टक्के हरियाणा - 63 टक्के पंजाब - 65 टक्के जम्मू आणि काश्मीर - 24 टक्के एकूण 8 राज्यात 85 जागांसाठी मतदान : एकूण मतदार - 9 कोटी 46 लाखएकूण उमेदवार - 1 हजार 315निवडणूक कर्मचारी - 6 लाख 50 हजारमहिला उमेदवार - 119गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार- 164करोडपती उमेदवार - 259एकूण मतदान केंद्र - 1 लाख 29 हजार 103मतदानाचा चौथा टप्पा आज गुरूवारी संपला. दोनशे बहात्तरची मॅजिक फिगर गाठण्यासाठी दिल्लीत हलचाली सुरु झाल्या. निवडणुकनंतरच्या आघाड्यांवर राजकीय नेत्यांची जुळवाजुळव सुरु आहे. अजून एका टप्प्यातलं मतदान बाकी आहे. 16 एप्रिलपासून सुरू झालेल्या या निवडणुकीचा शेवटचा म्हणजे पाचवा टप्पा 13 मे ला पार पडणार आहे. 16 मे ला होणार्‍या मतमोजणीच्या तारखेची आकडेमोड ध्यानात ठेवून राजकीय नेत्यांमध्ये चढाओढ सुरू आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: May 7, 2009 03:40 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 7, 2009 03:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...