महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव होणारच -मुख्यमंत्री

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2014 12:40 PM IST

7568cm_on_voting_list05 ऑगस्ट : नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा वादात सापडलंय पण यावेळी 'विघ्न' घातलंय ते सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांनी. मलिक यांनी यंदा सदनात गणेशोत्सव होणार नाही असा फतवाच काढलाय. त्यामुळे दिल्लीतली मराठीजनांनी आणि खासदारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. मात्र अधिकारी काहीही म्हटले तरी महाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सव होणारच, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र सदनात गेली अनेक वर्ष सुरू असणारा महाराष्ट्र सदन गणपती उत्सव यंदा होणार नाही अशी चर्चा आहे. महाराष्ट्राचे दिल्लीतील निवासी आयुक्त बिपीन मलिक यांचा गणेशोत्सव साजरा करायला पाठिंबा दिला नाही.

आतापर्यंत महाराष्ट्र सदनातले इतर अधिकारी हा उत्सव साजरा करत होते. पण आता यातल्या काही अधिकार्‍यांच्या महाराष्ट्रात पुन्हा बदल्या झाल्यात आणि यामुळे नवीन आलेले अधिकारी यात पुढाकार घ्यायला तयार नाहीत.

दिल्लीतल्या या महाराष्ट्र सदनातल्या गणपती उत्सवानमित्ताने दिल्लीतले मराठी नागरिक एकत्र येतात. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतल्या वास्तव्याच्या काळात दिल्लीतल्या मराठी माणसांनी एकत्र राहावं या दृष्टीने या उत्सवाची सुरूवात झाली होती. पण यंदा बिपीन मलिक यांच्या एकांगी भुमिकेमुळे ही परंपरा खंडीत होईल अशी शक्यता व्यक्त केली जातेय. अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनीही महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवात पूजा केली होती.

Loading...

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2014 10:29 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...