मोदींनी बोलावली राज्यातील शिलेदारांची बैठक

मोदींनी बोलावली राज्यातील शिलेदारांची बैठक

  • Share this:

narendra modi04 ऑगस्ट : विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. भाजपने मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून आता भाजपचे नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या (मंगळवारी) महाराष्ट्रातल्या सर्व भाजप खासदारांची तातडीने बैठक बोलावली आहे. ही बैठक उद्या संध्याकाळी सहा वाजता दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. बैठकीत महाराष्ट्रातील विकास आणि राजकीय धोरणांबाबत चर्चा होणार असल्याचं कळतंय. विशेष म्हणजे काही दिवसांपुर्वीच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी महाराष्ट्रातल्या सर्व भाजपच्या नेत्यांनी बैठक घेतली होती, त्यानंतर त्यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरमध्ये भेट घेतली.

अमित शाह यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भाजप नेत्यांनी सेनेसोबतच्या युतीचा मुद्दा उपस्थित केला होता. आता मोदी यांच्यासोबत होणार्‍या बैठकीत नरेंद्र मोदी भाजप नेत्यांना कोणता विजयी मंत्र देता याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

Follow @ibnlokmattv

First published: August 4, 2014, 8:13 PM IST

ताज्या बातम्या