S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

महाराष्ट्र सदनात यंदा गणेशोत्सव नाही?

Samruddha Bhambure | Updated On: Aug 4, 2014 06:34 PM IST

maharashtra_sadan

04 ऑगस्ट :   महाराष्ट्र सदन पुन्हा एकदा वादाच्या भोवर्‍यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेला महाराष्ट्र सदन गणपती उत्सव यंदा होणार नाही अशी चर्चा होत आहे.

महाराष्ट्र सदनात मुस्लीम कर्मचार्‍याला चपाती भरवण्यावरून झालेला गोंधळाची घटना अजूनही ताजी असताना महाराष्ट्र सदनात पुन्हा एक नव्या वादाने जोर धरला आहे. दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त बिपीन मलिक यांचा गणेशोत्सव साजरा करण्यास विरोध असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.


महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो, त्या निमित्ताने दिल्लीतील सर्व मराठी रहिवासी एकत्र येतात. बिपीन मलिक यांचा महाराष्ट्र सदनात गणेशोत्सव साजरा करायला पाठिंबा नसतो पण आतापर्यंत महाराष्ट्र सदनातले इतर अधिकारी हा उत्सव साजरा करायचे. पण आता यातल्या काही अधिकार्‍यांच्या महाराष्ट्रात पुन्हा बदल्या झाल्या आहेत आणि नवीन आलेले अधिकारी यासाठी पुढाकार घ्यायला तयार नाहीत. राज्य शासनाचा सदनात साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाशी काहीही संबंध नाही. राज्य शासन यात सहभागी होत नाही, त्यामुळे यावर्षी महाराष्ट्र सदनात उत्सव साजरा होईल की नाही हे आपल्याला माहीत नाही, असे मलिक यांनी सांगितल्याचे समजते. बिपीन मलिक यांच्या एकांगी भूमिकेमुळे ही परंपरा खंडित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Follow @ibnlokmattv

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 4, 2014 12:52 PM IST

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close