लोकसभेत माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

लोकसभेत माळीण दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली

  • Share this:

loksabha_pune31 जुलै : पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात माळीण गावावर दु:खाचं डोंगर कोसळलंय. या दुर्घटनेतल्या मृतांना लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली.

लोकसभेचं कामकाज सुरू होताच सभापती सुमित्रा महाजन यांनी या दुर्घटनेची माहिती सभागृहाला दिली आणि सभागृहाच्या वतीनं दु:ख व्यक्त करण्यात आलं.

माळीण गावात बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरकडा कोसळल्यामुळे अख्ख गाव ढिगाराखाली गाडलं गेलं. आतापर्यंत या दुर्घटनेत 30 जणांचा मृत्यू झालाय तर आणखी 150 जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे.

आज सकाळी 8 जणांना वाचवण्यात बचावपथकाला यश आलंय. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी घटनास्थळी भेट दिली. केंद्र सरकारकडून मृतांच्या नातेवाईकांना दोन लाखांची मदत जाहीर करण्यात आलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2014 04:20 PM IST

ताज्या बातम्या