उत्तराखंडमधल्या तेहरीमध्ये ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधल्या तेहरीमध्ये ढगफुटी, 4 जणांचा मृत्यू

  • Share this:

Uttarakhand

31  जुलै : उत्तराखंडतल्या उत्तर भागात तेहरीत आज सकाळी ढगफुटी झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी आहेत.

उत्तराखंडमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. आज सकाळी तेहरी जिल्ह्यात झालेल्या ढगफुटीत चार जण ठार तर अनेक जण जखमी झाले आहेत. काही जण वाहून गेल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मुसळधार पावसामुळे रुद्रप्रयाग आणि तेहरी दरम्यानचा रस्ता बंद करण्यात आला आहे.

दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस कोसळत असून, येत्या 24 तासांत पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

First published: July 31, 2014, 11:59 AM IST

ताज्या बातम्या