S M L

पाककडून सीमारेषेवर पुन्हा गोळीबार, 1 जवान शहीद

Sachin Salve | Updated On: Jul 22, 2014 05:03 PM IST

loc pak22 जुलै : पाकिस्तानने पुन्हा एकदा सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. जम्मूतील अखनूर भागात पाककडून गोळीबार करण्यात आलाय. या गोळीबारात एक जवान शहीद झाला असून 2 जण जखमी झाले आहे.

अखनूरजवळ चकला पोस्टच्या जवळपास अतिरेक्यांची घुसखोरी करण्यासाठी पाकने गोळीबार केला याला भारतीय सैन्यानेही प्रत्युत्तर दिलंय. गेल्या काही दिवसांत पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं अनेकदा उल्लंघन झालंय. याच महिन्यातली ही पाचवी घटना आहे. सीमारेषेवर पाकच्या कुरापात्यामुळे संरक्षण मंत्री अरुण जेटली यांनी आज संसदेत हा मुद्दा उपस्थित केला.

शस्त्रसंधीच्या उल्लंघनांचं भारताने प्रत्युत्तर दिलंय. यापुढे आम्ही माघार घेणार नाही जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशाराही जेटलींनी दिली. सीमारेषेवर गेल्या काही दिवसांपासून घुसखोरीच्या घटना घडत आहे.


सरकार शस्त्रसंधीचं उल्लंघन करू नये असा आवाहन करत आहे पण पाक सैन्य वारंवार याचं उल्लंघन करत आहे असा दावाही जेटली यांनी केला. मागील एकावर्षात पाक सैन्याने जवळपास 200 वेळा सीमारेषेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलंय. पाककडून झालेल्या गोळीबारात 13 जवान शहीद झाले आहे तर 41 जण जखमी झाले आहे.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 22, 2014 05:03 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close