मंदींच्या काळात बँकिंग सेक्टरकडून नोकरीचा दिलासा

28 एप्रिल,अमृता दुर्वे मंदींचं संकट अजूनही सगळ्याच देशांना भेडसावतंय. उद्योगधंद्यांवर परिणाम झाल्याने नोकर्‍या अडचणीत आल्या आहेत. आणि सगळ्यात जास्त फटका बसणार आहे तो आयटी क्षेत्राला. कमी झालेलं कॉन्ट्रॅक्टसचं प्रमाण, कॉस्ट कटिंग यामुळे देशभरातल्या आयटी कंपन्या येत्या 6 महिन्यांमध्ये कर्मचारी कपात करण्याच्या तयारीत आहेत. भारतीय आयटी क्षेत्रात सध्या 22 लाख लोकं आहेत आणि यातल्या लाखभर नोकर्‍या आता धोक्यात आल्या आहेत. डेलॉईटच्या मते या तिमाहीमध्ये आयटी कंपन्या 5 ते 6 टक्के कर्मचारी कपात करण्याची शक्यात आहे. कर्मचार्‍यांच्या परफॉर्मन्सनुसार सीनियर आणि मिडल लेव्हल मधून जास्त नोकर्‍या जाण्याची शक्यता आहे. पुढच्या सहा महिन्यात या कर्मचारी कपातीचं प्रमाण जास्त असेल. अनिल अंबानींच्या रिलायन्स मनीनेही एकूण 2000 पैकी 300 कर्मचारी कमी केलेयत. या सगळ्या परिस्थितीत दिलासा मिळेल तो बँकिंग सेक्टरकडून. चालू वर्षात बँकिंग सेक्टर 30 हजार नोकर्‍या देईल. बँक ऑफ बडोदा यावर्षी 2500 नवे कर्मचारी घेईल. तर मागच्या वर्षी निवडण्यात आलेले 3100 रिक्रूटही बँकेत सामील होतील.ओरियंटल बँक ऑफ कॉमर्स या वर्षात 2000 पेक्षा जास्त कर्मचारी भरती करेल आणि सोबतच आधी निवडण्यात आलेले 1800 कर्मचारीही येत्या 2-3 महिन्यात बँकेत रुजू होतील.एकूणच येत्या 6 महिन्यात निर्माण होणार्‍या नोकर्‍यांपेक्षा कमी होणार्‍या नोकर्‍यांचंच प्रमाण जास्त असेल.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 28, 2009 05:08 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 28, 2009 05:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...