19 जुलै : उत्तर भारतात मान्सून दाखल झाला आहे मात्र उत्तराखंडच्या काही भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. काही ठिकाणचे रस्तेही बंद करण्यात आले आहेत.
पावसामुळे चारधाम यात्रेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. सध्या तरी चारधाम यात्रा स्थगित करण्यात आली आहे. केंद्र सरकारने खबरदारी म्हणून दोन एमआय-17 हेलिकॉप्टर पाठवण्याचं ठरवलंय.
प्रशासनाने रुद्रप्रयाग आणि उत्तरकाशी याठिकाणी अलर्ट जारी केला आहे. तर दुसरीकडे हिमाचल प्रदेशातही मुसळधार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडल्याची माहिती आहे.
Follow @ibnlokmattv |