मुस्लिमांनी आता हिंदूंच्या भावनांचा आदर करावा -सिंघल

मुस्लिमांनी आता हिंदूंच्या भावनांचा आदर करावा -सिंघल

  • Share this:

65asokh_singhal17 जुलै : लोकसभा निवडणुकीत भाजपला मिळालेलं यश म्हणजे देशातल्या मुस्लीम राजकारणाला बसलेला धक्का आहे असं वादग्रस्त विधान विश्व हिंदू परिषदेचे वरिष्ठ नेते अशोक सिंघल यांनी केलंय.

'हिंदुस्तान टाईम्स'या वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे मत व्यक्त केलंय. मुस्लिमांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीवरचा हक्क सोडून द्यावा असा सल्लाही सिंघल यांनी दिलाय.

नरेंद्र मोदींचं सरकार हे मुस्लिमांच्या पाठिंब्याशिवाय सत्तेत आलेलं सरकार आहे आणि आता मुस्लिमांनी हिंदू भावनांचा आदर क रण्याची वेळ आली आहे असंही त्यांनी या मुलाखतीत म्हटलंय. नरेंद्र मोदी हे संघाचे आदर्श स्वयंसेवक असल्याचं प्रशस्तीपत्रही सिंघल यांनी दिलंय.

सिंघल यांनी काय म्हटलंय ?

- या निवडणुका म्हणजे मुस्लीम राजकारणाला बसलेला धक्का आहे. परदेशी आणि फुटीरवादी शक्तींनी आमची ओळख नष्ट करण्यासाठी या राजकारणाचा वापर केला. आता त्यांनी योग्य तो बोध घेण्याची वेळ आलीये. मुस्लिमांना सामान्य नागरिक म्हणूनच वागवले जाईल. कमी नाही, जास्त नाही. त्यांनी हिंदूंच्या भावनांचा विचार करणं शिकलं पाहिजे. त्यांनी हिंदूंना विरोध केला तर ते कसे काय जगू शकतील? आम्ही त्यांच्याशी प्रेमानं वागू आणि इतर मशिदींच्या जागाही मागणार नाही. पण त्यांनी अयोध्या, मथुरा आणि वाराणसीवरचा हक्क सोडला पाहिजे. त्यांना हे मान्य नसेल तर या देशातला हिंदू आणखी एकत्र येईल, त्याची त्यांनी तयारी ठेवावी.

First published: July 17, 2014, 9:13 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading