Elec-widget

सर्वाधिक लोकसंख्येत दिल्लीचा जगात दुसरा क्रमांक

सर्वाधिक लोकसंख्येत दिल्लीचा जगात दुसरा क्रमांक

  • Share this:

09indiagate_delhi_crowd12 जुलै : देशाची राजधानी दिल्लीने सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात जागतिक यादीत दुसरं स्थान मिळवलंय. या यादीत जपानची राजधानी टोकियोचा नंबर पहिला लागला आहे. याबाबत संयुक्त राष्ट्राने आपला अहवाल सादर केलाय.

1990 पासून दिल्लीची लोकसंख्या दुपटीने वाढली आहे. दिल्लीमध्ये तब्बल अडीच कोटी नागरिक राहतात. तर टोकियोची लोकसंख्या साडे तीन कोटींवर आहे. या यादीत मुंबईचा सहावा क्रमांक लागतो. मुंबईची लोकसंख्या याच वेगाने वाढत राहिली तर 2030 पर्यंत मुंबई चौथ्या क्रमांकावर जाईल असं भाकितही वर्तवण्यात आलंय.

टोकियो, दिल्लीनंतर या यादीत शांघायचा तिसरा क्रमांक लागलाय. शांघायमध्ये सध्या 23 दशलक्ष लोक राहतात. संयुक्त राष्ट्राच्या अहवालानुसार, मेक्सिको सिटी, मुंबई आणि साओ पाओलोची लोकसंख्या 2014 मध्ये जवळपास 21 कोटी एवढी आहे.

तसंच 2014 आणि 2015 या दरम्यान शहरी लोकसंख्येत सर्वाधिक वाढ भारत,चीन आणि नायजेरिया या देशांत होईल. आफ्रिका-आशिया खंडात सर्वाधिक शहरी लोकसंख्या वाढलीय. भारतात सध्या 41 कोटी एवढी शहरी लोकसंख्या आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 12, 2014 01:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...