S M L

'जय जवान, जय किसान'

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 02:20 PM IST

'जय जवान, जय किसान'

83jay_javan_jay kisan10 जुलै : 'जय जवान, किसान' नारा देत मोदी सरकारने देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर लढणार्‍या जवानांना आणि बळीराजाला खूश केलंय. मोदी सरकारने आज आपला पहिला अर्थसंकल्प सादर केला. यात प्रामुख्याने शेतकरी आणि देशासाठी लढणार्‍या जवानांसाठी खास घोषणा करण्यात आल्यात. संरक्षण क्षेत्रात एफडीआयला दार मोकळे करण्यात आले असून आता एफडीआयची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसंच संरक्षण क्षेत्रासाठी 2.29 लाख कोटींची तरतूद करण्यात आलीय. गोव्यात आयएनएस विक्रामादित्य लोकार्पण सोहळ्याच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जवानांसाठी वन रँक वन पेंशन योजना आणि युद्ध स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली होती. मोदींनी आपला शब्द पाळत बजेटमध्ये वन रँक वन पेंशन योजना राबवण्याठी 1 हजार कोटींची तरतूद केली आहे. आणि देशात पहिल्यांदात युद्ध स्मारक उभारण्यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

'बळीराजा तुझ्यासाठी काय पण'

मोदी सरकारने आश्वासनं दिल्याप्रमाणे 2015 पर्यंत 4 टक्के कृषी दरात वाढीचे लक्ष्य ठेवत शेतकर्‍यांसाठी भरभरुन घोषणा केल्यात. सिंचनासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना राबवण्यात येणार असून यासाठी 1 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्याचबरोबर शेतकर्‍यांसाठी नवीन 'किसान टीव्ही' चॅनल सुरू करणार अशी घोषणा करण्यात आलीय. या 'किसान टीव्ही' चॅनलसाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आलीय. त्याचबरोबर नेहमी कृषी मालाची साठवणूक करण्याची अडचण लक्षात घेता गोदामासाठी 5 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. शेतकर्‍यांना कृषी कर्जासाठी 8 हजार कोटींची तरतूदही करण्यात आली.



संरक्षणासाठी घोषणा

  • संरक्षण क्षेत्रात एफडीआयची मर्यादा 49 टक्क्यांपर्यंत वाढवली
  • Loading...

  • संरक्षण क्षेत्रासाठी 2.29 लाख कोटी
  • वन रँक वन पेंशन योजना राबवण्याठी 1 हजार कोटींची तरतूद
  • युद्ध स्मारकासाठी 100 कोटींची तरतूद

शेतकर्‍यांसाठी घोषणा

  • देशी पशुधनाच्या विकासासाठी 50 कोटींची तरतूद
  • कृषी मालांसाठी गोदामं उभारणार, 5 हजार कोटींची तरतूद
  • 8 कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवणार
  • शेतकर्‍यांसाठी विशेष चॅनेल, 100 कोटींची तरतूद
  • 2015 मध्ये 4 टक्के कृषी दरात वाढीचे लक्ष्य
  • कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा वाढवणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2014 05:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close