मुंबईकरांच्या पदरी पुन्हा निराशाच !

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jul 12, 2014 02:20 PM IST

मुंबईकरांच्या पदरी पुन्हा निराशाच !

Mumbai Local

08 जुलै : देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणार्‍या मुंबईच्या वाट्याला रेल्वे अर्थसंकल्पात वाटण्याच्या अक्षदा दाखवण्यात आल्यात. मोदींच्या सरकारने आज पहिलं रेल्वे बजेट सादर केलं. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी संसदेत हे बजेट मांडलं. मुंबईची लोकल म्हणजेचं मुंबईकरांची लाईफ लाईन. मात्र मुंबईच्या वाट्याला मागच्या वर्षीची तरतूद नव्याने गळी उतरवण्यात आलीय. मुंबईसाठी मागील बजेटमध्ये 864 लोकलची घोषणा करण्यात आली होती त्याचं घोषणेचा रेल्वेमंत्र्यांनी पुनरुच्चार केलाय.

विशेष म्हणजे मोदी सरकारने बजेटपुर्वीच 14.2 टक्के भाडेवाढ करुन सर्वसामान्य प्रवाशांना धक्का दिला. याचा सर्वात मोठा फटका मुंबईकरांना बसला. यानंतर भाववाढीचा भार हलका करत मुंबईकरांना दिलासाही दिला. पण भाडेवाढीतून मुंबईकरांची सुटका झाली नाही. लोकलच्या सेकंड क्लासच्या तिकिटमध्ये 80 किमीच्या पुढे दरवाढ करण्याचा निर्णय घेतला एवढाच दिलासा मुंबईकरांना मिळाला. मात्र बजेटमध्ये मुंबईत मागील वर्षीच्या घोषणेची रिघ ओढण्यात आली.

मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आली. त्यापाठोपाठ मुंबई-गोरखपूर, मुंबई- पटियाला गाड्यांचीही घोषणा करण्यात आली पण याचा सर्व सामान्य मुंबईकरांला फारसा फायदा नाही. विशेष म्हणजे मुंबईतून 40 टक्के रेल्वेनं प्रवाशी प्रवास करतात. महसूल असो अथवा कर याबाबत सर्वात जास्त भरणा करण्यात मुंबईकरपुढे असतो. पण बजेटमध्ये मुंबईकरांच्या पदरी मात्र निराशाच पडली.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 04:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...