S M L

मोदी सरकारची 'हायटेक' एक्स्प्रेस सुसाट

Sachin Salve | Updated On: Jul 12, 2014 02:21 PM IST

मोदी सरकारची 'हायटेक' एक्स्प्रेस सुसाट

modi_sarkar_rail_budget_201408 जुलै : 'अच्छे दिन आनेवाले है' गोड स्वप्न दाखवून सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने आज पहिली 'परीक्षा' दिलीय. रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी आगामी वर्षे 2014-15 साठी रेल्वेचा अर्थसंकल्प सादर केला. अगोदरच भाडेवाढ केल्यामुळे नाराज जनतेच्या धाकामुळे रेल्वेमंत्र्यांनी हात आकसता घेत घोषणांचा पाऊस पाडला. भारतीय रेल्वे आधुनिकीकरणावर रेल्वेमंत्र्यांनी प्रामुख्यांनी भर दिला. यात बहुचर्चित बुलेट ट्रेनची घोषणा करण्यात आलीय. मुंबई ते अहमदाबाद अशीही बुलेट ट्रेन धावणार आहे. पण बुलेट ट्रेन ट्रॅकवर उतरवण्यासाठी तब्बल 60 हजार कोटींचा खर्च आणि बराचसा कालावधी लागणार असल्याचंही गौडांनी स्पष्ट केलं.

तसंच निवडक गाड्यांमध्ये वायफाय, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा, मानवरहित क्रॉसिंग, ऑटोमॅटिक दारं, बायो-टॉयलेट अशा भव्य दिव्य घोषणा रेल्वे मंत्र्यांनी केल्यात. त्याचबरोबर 9 मुख्य शहरांना हाय स्पीड गाड्याने जोडण्यात येणार आहे. यामध्ये दिल्ली-आग्रा, दिल्ली-चंडिगढ, दिल्ली-कानपूर, कानपूर-नागपूर, म्हैसूर-बंगळुरू-चेन्नई या मार्गावर हायस्पीड गाड्या धावणार आहे.

तर सर्वसामान्यांसाठी 5 जनसाधारण, 5 प्रिमिअम, 6 एसी, 27 एक्स्प्रेस आणि 8 पॅसेंजर गाड्यांची घोषणा करण्यात आलीय. त्याचबरोबर मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेस, मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेसची घोषणा करण्यात आलीय. तसंच रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी थेट परकीय गुंतवणूक FDI साठी दार मोकळे केले आहे. पण मुंबईसह महाराष्ट्राला पुन्हा वाटाण्याच्या अक्षदा दाखवण्यात आल्यात. मुंबईसाठी कोणतीही भरीव अशी घोषणा करण्यात आली नाही. महाराष्ट्राच्या वाट्याला गदक-पंढरपूर ही नवीन एकच गाडी पदरी पडलीय.


नव्या घोषणा

- रेल्वे मंत्र्यांनी सादर केलं रेल्वेच्या आधुनिकीकरणावर भर देणारं रेल्वे बजेट

- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची घोषणा

Loading...

- 9 विभागांमध्ये धावणार हाय स्पीड गाड्या

- 5 जनसाधारण, 5 प्रिमिअम, 6 एसी, 27 एक्सप्रेस आणि 8 पॅसेंजर गाड्यांची घोषणा

- रेल्वे बजेमध्ये मुंबईकरांची यावर्षीही निराशा

- तिकीट वाढलं पण, नव्या सुविधा नाही

- मुंबई-गोरखपूर जनसाधारण एक्स्प्रेसची घोषणा

- मुंबई-नवी दिल्ली प्रिमिअम एसी एक्स्प्रेसची घोषणा

- नवी दिल्ली-कोल्हापूर शताब्दी ट्रेनची घोषणा

- हुजूरसाहेब नांदेड-अमृतसर एक्स्प्रेस घोषणा

- मुंबई-पटियाला ट्रेनची घोषणा

- पुणे-नागपूर आणि पुणे-अमृतसर नव्या साप्ताहिक गाड्या

- गदक-पंढरपूर नवीन गाडी

- कसारा-इगतपुरी नवीन लाईन ट्रॅक

- सोलापूर-तुळजापूर नवीन लाईन ट्रॅक

नव्या सुविधा

- रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी परकीय गुंतवणूक

- सार्वजनिक-खाजगी भागीदारीतून नवे रेल्वे प्रकल्प पूर्ण करणार

- स्वच्छतेला प्राधान्य, निधीत 40 टक्क्यांची वाढ

- प्रवाशांच्या सुरक्षेवर विशेष भर, अत्याधुनिक सुरक्षा यंत्रणा बसवणार

- मानवरहित क्रॉसिंगसाठी भरीव निधी

- ऑटोमॅटिक दारं बसवणार, बायो-टॉयलेट बांधणार

- निवडक गाड्यांमध्ये वाय-फाय

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 8, 2014 03:02 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close