केंद्रात विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस कोर्टात जाण्याच्या तयारीत

केंद्रात विरोधी पक्षनेते पदासाठी काँग्रेस कोर्टात जाण्याच्या तयारीत

  • Share this:

sonia-and-rahul_350_08051301012106  जुलै :   केंद्रात विरोधी पक्षनेतेपद कोणाला मिळणार याचा तिढा अजूनही कायम आहे. विरोधी पक्षनेतेपदासाठी अजून अंतिम निर्णय झालेला नाही त्यामुळे या पदासाठी काँग्रेस कोर्टात जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झालेल्या काँग्रेसला विरोधी पक्षासाठी म्हणूनही जनतेने निवडून दिलं नाही. विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी आवश्यक संख्याबळ काँग्रेसकडे नाही. लोकसभेत काँग्रेस क्रमांक दोनचा पक्ष आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद मिळावं यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे. काँग्रेस आता कोर्टात जाण्याची शक्यता आहे. या संदर्भात अजून कोणातही अंतिम निर्णय झालेला नाही पण पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर त्यासंदर्भात चर्चा सुरू आहे.

दरम्यान, काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपदावर दावा करण्याचा नैतिक, राजकीय आणि घटनात्मक अधिकार नाही, असं भाजपनं म्हटलं आहे. तर जशी करणी तशी भरणी असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला आहे.

First published: July 6, 2014, 8:45 PM IST

ताज्या बातम्या