दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यांमध्ये मतदान

दुसर्‍या टप्प्यात 13 राज्यांमध्ये मतदान

22 एप्रिल गुरूवारी मतदानाचा दुसरा टप्पा सुरू होत आहे. देशातल्या 13 राज्यांमध्ये 141 जागांसाठी मतदान होणार आहे. एकूण 2 हजार 141 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 121 महिला उमेदवारांचा समावेश आहे. महाराष्ट्रात एकूण 25 मतदारसंघात मतदान होतंय. 15 जागांवर काँग्रेस-राष्ट्रवादी आणि सेना-भाजप युतीमध्ये सरळ लढत आहे. तर इतर मतदारसंघात बसपा किंवा बंडखोर उमेदवार असल्यानं तिरंगी लढत आहे. उत्तर महाराष्ट्रात 6, मराठवाड्यात 5 जागांसाठी मतदान होतंय. पश्चिम महाराष्ट्रात 12 मतदारसंघाततर कोकणात 2 मतदारसंघात मतदान होतंय.देशभरात एकूण 19 कोटी 48 लाखांपेक्षा जास्त मतदार गुरूवारी आपला हक्क बजावतील. मतदारांची ही संख्या पाकिस्तानच्या एकूण लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. एकूण तेरा राज्यांमध्ये मतदान होणार आहे. पण मणिपूरमधल्या एका जागेचं मतदान आजच झालं आहे. लोकसभेबरोबरच आंध्रप्रदेश आणि ओरिसामध्येविधानसभेसाठीही मतदार कौल देतील.शरद पवार, राहुल गांधी, सुशीलकुमार शिंदे, ए. आर अंतुले, अनंत गीते, गोपीनाथ मंुडे, रामदास आठवले रामविलास पासवान, सुषमा स्वराज, कमलनाथ, अखिलेश प्रसाद सिंग, रघुनाथ प्रसाद सिंग आणि जॉर्ज फर्नांडिस या काही दिग्गजांचं भवितव्य या टप्प्यात ठरणार आहे. राहुल गांधी अमेठीतून दुसर्‍यांदा निवडून येण्यासाठी उत्सुक आहेत. तर माढामध्ये शरद पवार किती मतांच्या फरकानं निवडून येतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

  • Share this:

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 22, 2009 04:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...