विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला

विनाअनुदानित गॅस सिलेंडर महागला

  • Share this:

BG_CYLINDER_

01  जुलै :  अच्छे दिनचं स्वप्न दाखवणार्‍या मोदी सरकारने आज सर्वसामान्य जनतेला आणखी एक धक्का दिला आहे. आधी रेल्वे, मग पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीच्या धक्क्यानंतर विनाअनुदानित गॅस सिलेंडरचे दरही वाढले आहेत. प्रत्येक सिलेंडरमागे आता 16.50 रुपयांची वाढ झाली आहे.

इराकमधल्या यादवीमुळे अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाने भाव वाढलेत. याचा परिणाम भारतातही जाणवतोय. पेट्रोल 1.69 रुपये प्रतिलीटर तर डिझेल प्रतिलीटर 50 पैसे महागलं आहे. सततच्या भाववाढीमुळे त्रासलेल्या जनतेला आता विनाअनुदानित गॅस सिलेंडरची भाववाढही सहन करावी लागणार आहे. दिलासा देणारी एकच गोष्ट म्हणजे अनुदानित 12 सिलेंडरचे दर वाढणार नाही. त्यानंतरच्या सिलेंडरवर ही दरवाढ लागू होणार आहे.

First published: July 1, 2014, 1:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading