आसामला पुराचा तडाखा, 12 बळी

आसामला पुराचा तडाखा, 12 बळी

  • Share this:

assam_rain28 जून : महाराष्ट्रात जरी मान्सून लांबला असला तरी आसाममध्ये मात्र तुफान पाऊस पडतोय. त्यामुळे आसाममध्ये अचानक पूरस्थिती निर्माण झाली आहेत. या पुरामुळे आतापर्यंत 12 जणांचा बळी गेलाय. गुवाहाटी आणि इतर 4 जिल्ह्यांना याचा फटका बसलाय. गुवाहाटीमध्ये गेले 15 तास सतत पाऊस पडतोय. यामुळे तिथे पूरस्थिती निर्माण झाली आहे.

जवळपास अर्धअधिक शहर पाण्याखाली गेल्याचं वृत्त आहे. आसामचे मुख्यमंत्री तरूण गोगोई यांनी पुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या विभागांची पाहणी केली आहे. प्रशासनाने गुवाहाटीतल्या पुराचं खापर तिथल्या अनधिकृत बंाधकामांवर फोडलंय. प्रशासनाच्या म्हणण्यानुसार या बांधकामांमुळे पाणी शहराबाहेर पडण्यास अडथळा येतोय.

First published: June 28, 2014, 8:19 PM IST

ताज्या बातम्या