शाळेत लैंगिक शिक्षणावर बंदी आणावी -हर्ष वर्धन

शाळेत लैंगिक शिक्षणावर बंदी आणावी -हर्ष वर्धन

  • Share this:

harsh vardhan _bjp _new27 जून : शाळांमध्ये दिल्या जाणार्‍या लैंगिक शिक्षणावर बंदी आणली पाहिजे असं अजब मत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी व्यक्त केलं. मूल्यशिक्षण अभ्यासक्रमामध्येच सामिल केलं पाहिजे आणि योगाची सक्ती केली पाहिजे अशी सुचनाही त्यांनी दिली.

वर्धन यांनी आपल्या ब्लॉगमध्ये शालेय शैक्षणिक अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणावर बंदी घालावी अशी मागणी केलीय. शालेय शिक्षणात मूल्यशिक्षण अभ्यासक्रम आणि भारतीय संस्कृतीच्या अभ्यासावर जोर दिला पाहिजे. तसंच योगा सक्तीचं केलं पाहिजे असंही हर्ष वर्धन म्हणाले.

या अगोदरही हर्ष वर्धन यांनी वादग्रस्त विधानामुळे अडचणीत सापडले होते. एडस जनजागृती मोहिमेत कंडोमच्या वापराला प्रोत्साहन देऊन नये असं विधान वर्धन यांनी केलं होतं. जर तुमच्या साथीदारावर तुमचा विश्वास असेल तर कंडोमचा वापर आवश्यक नाही असा खुलासाही त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानाच्या विरोधात सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतला होता. त्यानंतर आरोग्य खात्याला माफी मागावी लागली होती.

First published: June 27, 2014, 1:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading