आंध्र प्रदेशात ओएनजीसीच्या पाईपलाईनमध्ये स्फोट, 14 ठार

आंध्र प्रदेशात ओएनजीसीच्या पाईपलाईनमध्ये स्फोट, 14 ठार

  • Share this:

2014_fire_ongc27 जून : आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यात ओएनजीसीच्या पाईपलाईनमध्ये आज सकाळी स्फोट झाला. या स्फोटामध्ये 14 जणांचा मृत्यू झालाय, तसंच अनेकजण जखमी झाले आहेत. स्फोटानंतर ओएनजीसीनं हा प्रकल्प काही काळासाठी बंद केलाय. स्फोटानंतर मोठ्याप्रमाणावर आग लागली होती ती आता आटोक्यात आलीये.

स्फोटामुळे वायुगळती झाल्यानं अनेकांना त्रास झाला. पाईपलाईनला लागलेल्या आगीमुळे जवळपासची घरं, दुकानं नारळाच्या झाडांनाही आग लागली. ही आग आज सकाळी पाऊणे सहाच्या सुमाराला लागली असं गेलच्या अधिकारी वंदना चनाना यांनी सांगितलं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. या घटनेचा आंध्र प्रदेश सरकारनं अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला दिला आहे.

दरम्यान, या घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना पंतप्रधान निधीतून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या आगीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दुख व्यक्त केलंय. "मी पेट्रोलियम मंत्री, कॅबिनेट सेक्रेटरी आणि गेलच्या चेअरमनशी बोललोय. आणि त्यांना अपघातस्थळी तातडीनं मदत पोहोचवायला सांगितलं." असं ट्विट मोदी यांनी केलं.

First published: June 27, 2014, 12:44 PM IST

ताज्या बातम्या