मुख्यमंत्र्यांची दिल्ली वारी

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 21, 2014 01:10 PM IST

7568cm_on_voting_list21 जून : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या राज्यात नेतृत्व बदलाच्या हालचालींना आता वेग आलाय. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिल्ली गाठली असून मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे.

त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री गटाचे नेतेही दिल्लीत दाखल झाले आहे. पण मुख्यमंत्र्यांसाठी विधानसभेचा एकही आमदार दिल्लीत नाही. मुख्यमंत्र्यांनी आज (शनिवारी) दिल्लीत ए.के. अँटोनींची भेट घेतली. काल रात्री त्यांनी पक्षाध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचीही भेट घेतली होती.

मुख्यमंत्र्यांसह नारायण राणे, शिवाजीराव मोघे आणि शिवाजीराव देशमुखही दिल्लीत आहेत. आपलं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मुख्यमंत्र्यांच्या समर्थनासाठी मुख्यमंत्री गटाचे नेतेही दिल्लीत पोहोचले आहेत. शिवाजीराव देशमुख यांच्यासह माण खटावचे अपक्ष आमदार जयकुमार गोर्‍हे, सातार्‍याचे काँग्रेस आमदार आनंदराव पाटील, सुरेश जेठलिया, शिरीष कोतवाल, शिरीष चौधरी, दीपक आत्माराम, राजन भोसले दिल्लीत आहेत.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 21, 2014 01:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...