सिगारेट साडे तीन रुपयांनी महागणार?

सिगारेट साडे तीन रुपयांनी महागणार?

  • Share this:

756cigarette price hike20 जून : एकीकडे मोदी सरकारने रेल्वेचे भाडेवाढ करुन सर्वसामान्यांचा झटका दिलाय तर दुसरीकडे सिगारेट, बिडीच्या आहारी गेलेल्या व्यसनी लोकांना चांगलाच चटका दिलाय. सिगारेटच्या किमतीत साडे तीन रुपयांनी वाढ करा, अशी शिफारस केंद्रीय आरोग्य खात्याने  अर्थ मंत्रालयाला केलीय.

11 जुलैला बजेट सादर केली जाईल अशी शक्यता आहे. बजेटच्या आधी सर्व मंत्रालयं आपल्या शिफारसी अर्थ मंत्रालयाकडे पाठवत असतात. सिगारेटबाबतची शिफारसही त्याचाच एक भाग आहे. आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री हर्ष वर्धन यांनी याबद्दलची शिफारस केंद्राकडे पाठवली आहे.

First published: June 20, 2014, 11:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading