रेल्वेचा प्रवास 14.2 टक्क्यांनी महागला

रेल्वेचा प्रवास 14.2 टक्क्यांनी महागला

 • Share this:

railway_price_hick20 जून : 'अच्छे दिन आने वाले है' असं गोड आश्वासन देणार्‍या मोदी सरकारने सर्वसामान्य जनतेला पहिला झटका दिला आहे. सर्वसामान्यांचा 'गरीब रथ' अर्थात रेल्वेच्या भाड्यात वाढ करण्यात आली आहेत. 14.2 टक्के इतकीही वाढ करण्यात आली आहे. त्याबरोबरच मालवाहतुकीचे दरही वाढवण्यात आले आहे. मालवाहतुकीचे दर 4.5 टक्क्यांनी वाढवण्यात आले आहे. ही दरवाढ  25 जूनपासून लागू नवे दर लागू होणार आहेत. विशेष म्हणजे रेल्वे बजेटच्या अगोदरच सरकारने रेल्वेची भाडेवाढ करून महागाईने होरपळणार्‍या सर्वसामान्य जनतेवर अधिक बोजा लादला आहे.

मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या भाडेवाढीला काँग्रेसने विरोध केलाय. भाजप जेव्हा विरोधी बाकावर होता तेव्हा अशा भाडेवाढींना विरोध करत होता आता त्यांचं सरकार येऊन काही दिवस झाले नाही ते लगेच भाडेवाढ करण्यात आली. त्यांनी अगोदर लोकांचा विश्वास जिंकायला हवा होता त्याअगोदरच त्यांनी भाडेवाढ करुन खरा रंग दाखवून दिलाय अशी टीका काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी केली.

पण, पूर्वीच्या सरकारनेच भाडेवाढीचा निर्णय घेतला होता. 16 मे रोजीच हा निर्णय लागू करण्यात येणार होता. पण, नवीन सरकारने हा निर्णय घ्यावा, असं सांगून तो रोखण्यात आला होता. तेव्हा भाडेवाढीचा हा निर्णय पूर्वीच्या यूपीए सरकारचा आहे, असं रेल्वे मंत्री सदानंद गौडा यांनी स्पष्ट केलंय.

राज्यात प्रवासासाठी

मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस

 • आरक्षित नॉन एसी
 • पूर्वी: 95 रु.
 • आता: 109 रु

मुंबई-नागपूर नंदीग्राम एक्स्प्रेस

 • आरक्षित स्लीपर क्लास
 • पूर्वी: 440 रु.
 • आता: 503रु.

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्स्प्रेस

 • आरक्षित स्लीपर क्लास
 • पूर्वी: 265 रु.
 • आता: 303 रु.

राज्याबाहेर प्रवासासाठी

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी फर्स्ट क्लास
 • पूर्वी : 4135 रु.
 • आता : 4722 रु.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी सेकंड क्लास
 • पूर्वी : 2495 रु.
 • आता : 2849 रु.

मुंबई-दिल्ली राजधानी एक्स्प्रेस

 • एसी थर्ड क्लास
 • पूर्वी : 1815 रु.
 • आता : 2072 रु

First published: June 20, 2014, 5:38 PM IST

ताज्या बातम्या