हिंदी वापरण्यास जयललितांचाही विरोध

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jun 20, 2014 08:43 PM IST

Narendra Modi with Jayalalith20 जून : हिंदी भाषेवरुन  पुन्हा एकदा वाद पेटला आहे. सरकारी माहितीसाठी सोशल मीडियावर हिंदीचा जास्तीत जास्त वापर करावा, या सरकारच्या निर्देशाला विशेष दक्षिण भारतातून तीव्र विरोध होत आहे. करुणानिधी यांच्यापाठोपाठ तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांनी विरोध केलाय.

 

केंद्र सरकारने इंग्रजीमध्येच निरनिराळ्या खात्यांच्या कामाची माहिती प्रसारित करावी अशी मागणी करणारे पत्रच जयललिता यांनी केंद्राला लिहिलंय. हिंदी न समजणार्‍या राज्यांच्या सोयीसाठी ही मागणी करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. तर जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही जयललिता यांच्या मागणीला पाठिंबा दर्शवला आहे.

 

तर दुसरीकडे एनडीएचा मित्रपक्ष शिवसेनेनं निर्देशाचं स्वागत केलंय. सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं आपला पाठिंबा दर्शवला आहे. इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा वगैरे आहे ते ठीक आहे, पण म्हणून राष्ट्राची भाषा का मारावी?पट्टराणी इंग्रजीसाठी हिंदीचा अपमान कशाला करायचा? असा सवाल सेनेनं उपस्थित केला तसंच हिंदीतून बोलण्यास, प्रश्न विचारण्यास ओडिशा विधानसभेत आणली गेलेली बंदी धक्कादायक आहे असंही नमूद करण्यात आलंय.

Loading...

काय म्हटलंय 'सामना'त

"इंग्रजी ही जगाची ज्ञानभाषा वगैरे आहे ते ठीक आहे, पण म्हणून राष्ट्राची भाषा का मारावी?पट्टराणी इंग्रजीसाठी हिंदीचा अपमान कशाला करायचा? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदी भाषेला मानाचे स्थान दिलंय. अगदी भुतानच्या दौर्यावर असतानाही त्यांनी हिंदीतून भाषण केलं. असं असतानाच ओडिशा विधानसभेत मात्र हिंदीवर बंदी आणली गेलीये. हिंदीतून बोलण्यास, प्रश्न विचारण्यास ओडिशा विधानसभेत आणली गेलेली बंदी धक्कादायक आहे. यावर मुंबईसह देशातील हिंदी भक्तगणांचे काय म्हणणे आहे? महाराष्ट्राच्या विधानसभेत असे झाले असते तर एव्हाना सगळे हिंदी भाषिक पुढारी एक होऊन महाराष्ट्राविरुद्ध ठणाणा करताना दिसले असते."

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2014 02:26 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...