रेल्वे प्रवासही महागणार ?

रेल्वे प्रवासही महागणार ?

  • Share this:

44indian_railway17 जून : एकीकडे महागाईने गेल्या सहामहिन्यात उच्चांक गाठलाय त्यामुळे जनतेवर महागाईची आणखी कुर्‍हाड कोसळणार आहे त्यातच भरात भर म्हणजे रेल्वेचा प्रवासही महागण्याची शक्यता आहे.

रेल्वे बोर्ड प्रवासी भाड्यात वाढ करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेटही घेणार आहेत.त्यांच्या भेटीनंतरच भाडेवाढीचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे तर मालवाहतुकीत 5 टक्के भाडेवाढ होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रेल्वे बोर्डाने जरी भाडेवाढ करण्याचं ठरवलं असलं तरी पंतप्रधान मात्र या भाडेवाढीला अनुकुल नसल्याचं समजतंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2014 05:03 PM IST

ताज्या बातम्या