कसाब विरुद्ध कोर्टात सादर होणार पुरावे

18 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळे , अजित मांढरे 26 / 11 च्या मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या विरूद्ध आज कोर्टात पुरावे सादर होणार आहेत. 26 नोव्हेंबरच्या हल्लाप्रकरणाच्या सुनावणीचा आजचा चौथा दिवस आहे. आज सरकारी पक्ष कुबेर बोटीवर आणि कसाबजवळ ज्याज्या वस्तू सापडल्या होत्या त्या गोळा केलेल्या वस्तू आणि पुरावे न्यायालयात सादर करणार आहे. 26 /11 च्या खटल्यातला प्रमुख आरोपी कसाब याच्याविरोधात एकूण 12 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. या सर्व गुन्ह्यासंर्भातले पुरावे न्यायालयात क्रमाक्रमाने सादर केले जाणार आहेत. कसाब याच्या विरोधात कुबेर बोटीचे तांडेल अमरसिंग सोलंकी यांच्या हत्त्येचा सर्वात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच कुबेर बोटीवर कसाब आणि त्याच्या साथीदारांच्या अनेक वस्तू सापडल्या होत्या. 15 लाईव्ह जॅकेट्स, पाण्याच्या बाटल्या, चाकू अशा निरनिराळ्या प्रकारच्या जवळ जवळ 70 ते 75 चायनीज, कोरियन, पाकिस्तानी आणि इस्त्रायली बनावटीच्या वस्तू सापडल्या होत्या. त्याच वस्तू आज सादर केल्या जाणार आहेत. कसाबच्या खटल्याच्या सुनावणीचा तिसरा दिवस चांगलाच वादग्रस्त ठरला. मुंबईच्या आर्थर रोड विशेष न्यालयात सकाळी अकरा वाजता तिसर्‍या दिवसाचा खटला सुरू झाला. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी कसाबनं पोलिसांना दिलेला जबाब न्यायाधीश ताहिलयानी यांना वाचून दाखवला. त्यात - जेहादसाठी आम्हाला अडीच महिन्यांचं स्पेशल ट्रेनिंग देण्यात आलं. या ट्रेनिंगचा वैशिष्ट्य होतं जास्तीत जास्त नुकसान करणं आणि लोकांना मारणं. ते ट्रेनिंग तीन टप्प्यात होतं. पहिल्या टप्प्यात अतिशय कठीण असं शारीरिक ट्रेनिंग देण्यात आलं होतं. शिवाय कलशत म्हणजे एके-47, रायफल, पिस्टल आणि रॉकेट लॉचर कसं जोडायचं आणि फायर कसं करायचं हे शिकवण्यात आलं. शिवाय हॅन्ड ग्रेनाइड कसा बनवायचा आणि फोडायचा याचं प्रशिक्षण दिलं गेलं. शिवाय सॅटेलाईट फोन, जीपीएस सिसटम मॅप रिडिंग याचं ट्रेनिंग देण्यात आलं. दुसर्‍या टप्प्याचं ट्रेनिंग मरकस तसबा मुदीरके इथे झालं. यात इंटेलिजन्सचं स्पेशल ट्रेनिंग दिलं. टारगेटबाबत सांगण्यात आलं. शिवाय कोणी जर आपला पाठलाग करत असेल तर त्याला चकवायचं कसं, स्वता:ची ओळख लपवायची कशी, मिशन टारगेट कसं करायचं हेही शिकवण्यात आलं. आणि तिसर्‍यात टप्प्यात समुद्रीमार्गे प्रवास करायचा, मच्छीमारांचं जाळ कसं फेकायचं हे शिकवण्यात आलं. याचाउद्देश होता नौदलाला फसवणं. सुनावणी दरम्यान कसाबचा कबुली जबाब सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी वाचून दाखवला. कसाबच्या त्या कबुली जबाबात त्यानं दहशतवाद पसरवण्यात कोणाकोणाचा हात आहे याचा खुलासा केला आहे. कसाबचा हा संपूर्ण जबाब वाचून दाखवल्यानंतर, हा जबाब माझ्याकडून जबरदस्तीनं घेतलाय असं कसाबनं सांगितलं. यावरूनच कसाब किती चतुर आहे हे यावरून होतं. कारण त्याला अशा परिस्थितीत कसं वागायचं याचंही ट्रेनिंग देण्यात आलं आहे.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2009 07:37 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 18, 2009 07:37 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...