Elec-widget

मुंडेंच्या कारला धडक देणार्‍या 'त्या' ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

मुंडेंच्या कारला धडक देणार्‍या 'त्या' ड्रायव्हरवर गुन्हा दाखल

  • Share this:

6566munde_car_Accident16 जून : भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे अपघात प्रकरणी अखेर सीबीआयने चौकशी सुरू केली आहे. 3 जूनला सकाळी त्यांचा कार अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या गाडीवर धडकणार्‍या इंडिकाच्या ड्रायव्हरवर आता गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

 

सीबीआयने ड्रायव्हर गुरुविंदर याच्याविरोधात कलम 279 आणि 304 नुसार गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची आता सीबीआयने चौकशी सुरू केली आहे.

 

3 जून रोजी सकाळी गोपीनाथ मुंडे विमानतळाकडे जात असताना त्यांच्या कारला इंडिका कारने धडक दिली होती. या अपघातात मुंडे जखमी झाले होते त्यांना तातडीने उपचारासाठी एम्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.

Loading...

 

पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दिल्ली पोलिसांनी त्याच दिवशी गुरुविंदरला अटक केली होती पण दुसर्‍या दिवशी जामिनावर मुक्तता करण्यात आली होती. मुंडे यांचा मृत्यू हा अपघात होता का घातपात होता याची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी परळीकरांनी केली होती अखेर आज या प्रकरणाची सीबीआय चौकशी सुरू झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 16, 2014 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...