कसाबनं बदलला त्याचा कबुलीनामा

17 एप्रिल, मुंबई सुधाकर कांबळेजम्मू-काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी आम्ही मुंबईवर दहशतवादी हल्ला केला. या हल्ल्यासाठी उपयोगी असणारं सगळं प्रशिक्षण मला आणि माझ्या साथीदारांना पाकिस्तानातून दिलं गेलं, अशी आज कबुली देणा-या कसाबनं आता त्याचा कबुलीजनामा फिरवला आहे. ' पोलिसांनी कबुलीनामा लिहिला आहे. त्यावर माझी केवळ स्वाक्षरी घेण्यात आल्याचं कसाबनं न्यायालयापुढे सांगितलं, ' अशी माहिती त्याचे वकील ऍड. अब्बास काझमी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. मुंबई हल्ल्यातला एकमेव जिवंत आरोपी मोहम्मद अजमल कसाब याच्या 26/11 खटल्याच्या सुनावणीचा आजचा तिसरा दिवस होता. आर्थररोड तुरूंगातल्या विशेष कोर्टात सकाळी 11. 00 वाजता खटल्याच्या सुनावणीला सुरुवात झाली. सरकारी वकील उज्ज्वल निकम कसाबच्या कृष्णकृत्यांचा पाढा वाचत होते. कसाब आणि त्याच्या अन्य दोन साथीदारांवर भारताविरूद्ध युद्ध पुकारणं, हत्या करणं, हत्येचा प्रयत्न करणं, कटकारस्थान रचणं सारखे आरोप असल्याचं सरकारी वकील उज्ज्वल निकम म्हणाले. तर ऍड. अब्बास आझमी कसाबची बाजू मांडत होते. ऍड. अब्बास आझमी यांनी या पूर्वी गुलशन कुमार हत्याकांड, 1993चे मुंबई बॉम्बस्फोटांचे खटले लढवले आहेत. त्यामुळे यावेळी ते कसाबसाठी कोणता युक्तिवाद करणार आहेत याकडे संपूर्ण कोर्टाचं लक्ष लागून राहिलं होतं. हल्ला केला त्यावेळी मी साडे सतरा वर्षांचा होतो. त्यामुळे माझा हा खटला बालगुन्हेगार कोर्टात चालवावा, अशी मागणी कसाबने त्याच्या वकील ऍड. अब्बास काझमी यांच्यामार्फत आर्थर रोड विशेष न्यायालयात केली. पण आर्थररोड विशेष न्यायालयाने त्यांची ही मागणी फेटाळून लावली. कारण कसाबचा कबुलीनामा जेव्हा जेव्हा प्रसिद्ध झाला होता तेव्हा त्यात त्यानं तो 21 वर्षांचा असल्याचं कबूल केलं होतं. __PAGEBREAK__ For Pagging 26/11 खटल्याच्या सुनावणीच्या तिस-या दिवशी कसाबचा आधीचा कबुलीनामा हिंदी आणि उर्दुतून काहीप्रमाणात वाचला गेला. त्यात त्यानं स्वत:ची जन्मतारीख 30 डिसेंबर 1989 असल्याचं सांगितलं होतं. मला माझ्या साथीदारांना पाकिस्तानमध्ये हल्ल्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. जम्मू-काश्मीरला जर भारतापासून वेगळं करसयाचं असेल तर मुंबईवर आणि महत्त्वाच्या शहरांवर हल्ला हा केलाच पाहिजे, असं आमच्या मनावर बिंबवलं होतं. त्यामुळे मी आणि माझ्या साथीदारांनी अशी वाईट कृत्य केली. विदेशी नागरिकांना पहिलं टार्गेट करा, असंही आम्हाला सांगण्यात आलं होतं. मुंबई हल्ल्यासाठीच्या प्रशिक्षणावेळी एक मेजर जनरल यायचे. ते आमच्या प्रशिक्षण काळात आमच्यावर बारकाईनं लक्ष ठेवायचे. माझ्या बंदूक चालवण्याचंही त्यांनी कौतुक केलं होतं. असंही कसाबनं त्याच्या कबुलीनाम्यात सांगितलं होतं. पण आता कसाबनं त्याचा कबुलीनामा बदलल्यामुळे 26 /11 च्या खटल्याला निराळं वळण मिळालं आहे. कारण त्याचा कबुलीनामा हा 26 /11 च्या दहशतवादी खटल्याचा महत्त्वाचा पुरावा आहे. ' पण हा कबुलीनामा घेताना मला पोलिसांच्या शारीरिक आणि मानसिक छळाला सामोरं जावं लागल्याचंही कसाब म्हणाला असल्याची माहिती त्याचे वकील ऍड. अब्बास आझमी यांनी दिली. त्यामुळे कसाबच्या वयावर कोर्ट लवकरच निर्णय घेईल, असंही ऍड. अब्बास काझमी यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. कसाबच्या नातेवाईकांना त्याला सध्यातरी भेटता येणार नसल्याचंही त्यांनी पत्रकारपरिषेदत सांगितलं.

आईबीएन लोकमत | News18 Lokmat | Updated On: Apr 17, 2009 11:57 AM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 17, 2009 11:57 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...