लेफ्टनंट जनरल दलबीर सुहागच लष्करप्रमुख -जेटली

लेफ्टनंट जनरल दलबीर सुहागच लष्करप्रमुख -जेटली

  • Share this:

232jetli11  जून :  भावी लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल दलबीर सुहाग यांच्यासंदर्भात संरक्षण खात्याने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून आता व्ही के सिंग अधिक अडचणीत आले आहेत. या प्रतिज्ञापत्राच्या मुद्द्यावरून लोकसभेत आज गोंधळ झाला. व्ही के सिंग यांचा सुहाग यांच्या लष्करप्रमुखपदी नियुक्तीला ठाम आक्षेप आहे. पण संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी लष्करप्रमुखांची नियुक्ती अंतिम नियुक्ती असून सरकार त्या मुद्द्यावर ठाम असल्याचं स्पष्ट केलं आहे.

 जेटली यांच्या भूमिकेमुळेही सिंग यांच्या अडचणी वाढल्यात. यूपीए सरकारने सुहाग यांची लष्करप्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर त्यांच्या नियुक्तीला आव्हान देणारी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेला प्रतिज्ञापत्रातून उत्तर देण्यात आलं. या प्रतिज्ञापत्रात व्ही के सिंग यांनी सुहाग यांच्यावर केलेली शिस्तभंगाची कारवाई कोणत्याही योग्य कारणाशिवाय असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

आज काँग्रेसने लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणी काँग्रेसने व्ही के सिंग यांच्या राजीनाम्याची मागणीही केली आहे. हे प्रतिज्ञापत्र म्हणजे व्ही के सिंग यांच्याविरोधातल्या अविश्वास ठरावाप्रमाणेच आहे असं काँग्रेसने म्हटलं आहे. या प्रकरणी व्ही के सिंग यांनी ट्विट केलंय. हे प्रतिज्ञापत्र यूपीए सरकारच्या काळात बनवलं गेलंय. सुहाग यांनी निरपराध लोकांना मारल्याचा आरोपही व्ही के सिंग यांनी या ट्विटमध्ये केला आहे.

व्ही.के.सिंगांचं ट्विट

जर एखादं युनिट निरपराधांना मारत असेल, दरोडा टाकत असेल आणि त्याचा प्रमुख त्यांना संरक्षण देतो. त्याबद्दल त्याला दोष द्यायला नको? गुन्हेगारांना सोडून दिलं पाहिजे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 11, 2014 01:27 PM IST

ताज्या बातम्या