राष्ट्रपतींनी संसदेसमोर सादर केला मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा

राष्ट्रपतींनी संसदेसमोर सादर केला मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा

 • Share this:

president mukharjee08  जून : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज नव्या सरकारचा अजेंडा संसदेसमोर मांडला. आपल्या अभिभाषणात त्यांनी 'सबका साथ, सबका विकास' हेच सरकारचे ध्येय असल्याचं स्पष्ट केलं. लोकसभेच्या निवडणुका यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल त्यांनी निवडणूक आयोगाचं कौतुक केलं. तसंच लोकसभेच्या दुसर्‍या महिला अध्यक्ष सुमित्रा महाजन यांचंही अभिनंदन केलं.

या अजेंड्यामध्ये महागाई कमी करणे, ग्रामीण विकास, तंत्रज्ञान यासोबतच महिला विकासाकडे लक्ष दिलं जाणार आहे. जलदगती रेल्वेसाठी चतुष्कोन प्रकल्प, लहान शहरांना जोडणारी कमी खर्चातली विमानतळं, काश्मिरी पंडितांचे पुनर्वसन, महिलांना संसदेत 33 टक्के अरक्षण, 2022 पर्यंत प्रत्येक कुंटुबासाठी पक्की घरं, 24 तास वीजपुरवठा अशा अनेक योजनांचं सूतोवाच या अजेंड्यामध्ये करण्यात आलं आहे. सरकार दहशतवादाविरोधात कायम ठाम भूमिका घेईल, असं आश्वासन त्यांनी अजेंड्यामधून दिलं आहे.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणातील मुद्दे :-

 • दहशतवादाबाबत ठोस भूमिका
 • दहशतवाद सहन केला जाणार नाही
 • प्रत्येक कुटुंबाला पक्कं घर, 24 तास वीज हे सरकारपुढचं 2022 पर्यंतचं लक्ष्य
 • हिमालयासाठी राष्ट्रीय मिशनची स्थापना
 • रेल्वेचं आधुनिकीरण करणार
 • कामगार केंद्रीत उत्पादन आणि पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करणार
 • छोट्या शहरांना जोडण्यासाठी कमी खर्चातली विमानतळं बनवणार
 • जलदगती रेल्वेसेवेसाठी चतु:ष्कोन प्रकल्प आणणार
 • एफडीआयच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करून देणार
 • उद्योगक्षेत्राचा आत्मविश्‍वास वाढवण्यावर भर
 • टॅक्स गोळा करण्याचा दर वाढवण्यासाठी प्रयत्न करणार
 • उत्पादन वाढीसाठी एक खिडकी योजना आणणार
 • न्यायव्यवस्थेचं आधुनिकीकरण
 • न्यायप्रक्रिया अधिक सोपी आणि जलद बनविणार
 • सरकारच्या कामांसाठी सोशल मीडियाचा वापर करणार
 • काश्मिरी पंडित पुन्हा काश्मीर खोर्‍यात परतण्यासाठी त्यांना सुरक्षा देऊन विशेष प्रयत्न करणार
 • राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेच्या माध्यमातून आरोग्य योजना राबवणार
 • उत्तर-पूर्वेतल्या घुसखोरीबाबत ठोस कारवाई
 • महिलांवरील वाढत्या आत्याचारांविरोधात ठोस भूमिका
 • महिलांसाठी संसदेत 33% आरक्षण आणणार
 • मदरशांच्या विकासाठी योजना राबवणार
 • शहरी-ग्रामीण अशी दरी दूर करण्याचा प्रयत्न करणार
 • शेतकरी आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न करणार
 • पंतप्रधान कृषी सिंचन योजनेच्या माध्यमातून जल अधिकार देणार
 • समान शिक्षण पद्धती राबवणार
 • स्वस्थ भारत मिशनच्या माध्यमातून पब्लिक टॉयलेट्स बांधण्यावर भर देणार
 • आरोग्यसेवांवर भर देणार
 • नवीन युथ पॉलिसी आणणार
 • योगाचा प्रसार करणार
 • ग्रामीण क्रीडाप्रकारांकडे लक्ष देणार
 • तरुणांना योग्य ते प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी देणार
 • तरुणांसाठी ऑनलाईन कोर्सेस आणि व्हर्च्युअल क्लासरूमसाठी प्रयत्नशील
 • प्रत्येक राज्यांत आयआयटी आणि आयआयएमची स्थापना करणार
 • राष्ट्रीय ई-लायब्ररीची स्थापना करणार
 • रखडलेले जलसंधारणाचे प्रकल्प पूर्ण करणार
 • पंचायती राजच्या माध्यमातून खेड्यांची स्थिती सुधारणार
 • जलसुरक्षेवर विशेष भर देणार
 • या वर्षी पाऊस कमी होणार असल्यानं त्यासाठी योग्य त्या उपाययोजनांसोबत सरकार तयार आहे
 • सरकार काळ्या पैशाबाबत ठोस भूमिका घेतंय
 • महागाई कमी करण्याचं सरकारचं मुख्य उद्दिष्ट
 • गरिबी हटवण्याचं सरकारचं लक्ष्य
 • भारताच्या नव्या अवतारात भ्रष्टाचाराला स्थान नसेल

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2014 03:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading