लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन यांची बिनविरोध निवड

लोकसभा अध्यक्षपदी सुमित्रा महाजन यांची बिनविरोध निवड

 • Share this:

sumitra mahanjan speaker

06 जून :   भाजपच्या जेष्ठ नेत्या आणि मध्यप्रदेशातल्या 8 वेळा लोकसभेत निवडून आलेल्या खासदार सुमित्रा महाजन यांची 16व्या लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला, त्याला सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी अनुमोदन दिलं. त्यानंतर आज त्यांच्या नावाची औपचरिक घोषणा करण्यात आली. सुमित्रा महाजन इंदूरच्या खासदार आहेत.

मूळच्या कोकणातल्या असणार्‍या सुमित्रा महाजन यांच्याविषयी अधिक जाणून घेऊयात.

नवीन अध्यक्ष

 • लोकसभेच्या दुसर्‍या महिला अध्यक्ष होणार
 • जन्म 12 एप्रिल 1943, चिपळूण, रत्नागिरी
 • उषा आणि पुरुषोत्तम साठे यांची कन्या
 • शिक्षण - एमए, एलएलबी
 • 1982 - इंदूरच्या नगरसेविका
 • 1984 - इंदूरच्या उपमहापौर
 • इंदूरमध्ये 'सुमित्राताई' नावानं परिचित
 • 1989 पासून लोकसभेच्या खासदार
 • सलग आठ वेळा खासदारकीचा विक्रम
 • संसदेत सर्वाधिक काळ कार्यरत असलेल्या महिला खासदार

दरम्यान, सर्व पक्षांनी विश्वास दाखवल्याबद्दल सुमित्रा महाजन यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तर, सुमित्रा महाजन यांची निवड ही सर्व महीलांसाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे. यावेळी लोकसभेत बरेच खासदार हे पहील्यांदाच निवडून आले आहेत, या सगळ्याकडून सभागृहाला नविन ताकद मिळेल अशी विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.

First published: June 6, 2014, 2:08 PM IST

ताज्या बातम्या