संसदेतली अडवाणींच्या ऑफिसवरबाहेरची नेमप्लेट काढली?

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 5, 2014 08:17 PM IST

advani05 जून :  मंत्रिमंडळ निवडताना नरेंद्र मोदींनी 75 वर्षांपेक्षा जास्त वय असणार्‍या ज्येष्ठ नेत्यांना बाजूला ठेवलं होतं आणि आता भाजप पक्ष संघटनेतही असेच बदल होताना दिसत आहेत. लालकृष्ण अडवाणींच्या संसदेतल्या ऑफिसमधून त्यांच्या नावाची पाटी काढण्यात आली आहे.

लालकृष्ण अडवाणी NDAचे कार्यकारी अध्यक्ष होते. गेल्या काही दिवसांपासून अडवाणी स्वत:च्या नाही तर हे संसदेतल्या भाजपच्याच ऑफिसमध्ये बसतात होते. अडवाणींच्या नावाची पाटी हटवल्याने आता भाजप NDAच्या कार्यकारी अध्यक्षपदी नव्या अध्यक्षाची नेमणूक करणार याची चर्चा सुरू झाली आहे. तर दुसरीकडे संसदेतल्या ऑफिसमधली अटल बिहारी वायजेयींच्या नावाची पाटी मात्र अजून तशीच आहे. दरम्यान, सुमित्रा महाजन यांची लोकसभेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 5, 2014 06:12 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...